
अर्जुनी मोरगाव,दि.18 : शिव उत्सव मंडळ, पिंपळगाव/खांबीच्या सौजन्याने १९ फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ ते ९ वाजेदरम्यान ग्रामस्वच्छता अभियानाने करण्यात येईल. दरम्यान सकाळी १० वाजता महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम, शिवजन्मोत्सव पाळणा, दुपारी १२ वाजता ध्वजारोहण व रात्री ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर ‘गरज’चे (ऑर्केस्ट्रा) आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन पं.स. सभापती अरविंद शिवणकर यांच्या हस्ते कृउबासचे सभापती लायकराम भेंडारकर यांच्या अध्यक्षतेत करण्यात येईल. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुनील तरोणे, विजय डोये, हेमंत भांडारकर, शैलेश जायस्वाल, राजू वलथरे, संदीप फुंडे, मयंक जायस्वाल, अॅड. गौरीशंकर अवचटे, अॅड. एस. वनफुलकर, छगन पातोडे, होमराज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. .