अर्जुनी मोरगाव,दि.18 : शिव उत्सव मंडळ, पिंपळगाव/खांबीच्या सौजन्याने १९ फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ ते ९ वाजेदरम्यान ग्रामस्वच्छता अभियानाने करण्यात येईल. दरम्यान सकाळी १० वाजता महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम, शिवजन्मोत्सव पाळणा, दुपारी १२ वाजता ध्वजारोहण व रात्री ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर ‘गरज’चे (ऑर्केस्ट्रा) आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन पं.स. सभापती अरविंद शिवणकर यांच्या हस्ते कृउबासचे सभापती लायकराम भेंडारकर यांच्या अध्यक्षतेत करण्यात येईल. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुनील तरोणे, विजय डोये, हेमंत भांडारकर, शैलेश जायस्वाल, राजू वलथरे, संदीप फुंडे, मयंक जायस्वाल, अॅड. गौरीशंकर अवचटे, अॅड. एस. वनफुलकर, छगन पातोडे, होमराज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. .
छत्रपती शिवजन्मोत्सव सोहळा
रात्री ८ वाजता आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील ‘गजर’ (ऑर्केस्ट्रा) कार्यक्रमाचे उद्घाटन स्व. मनोहरभाई पटेल ॲकॅडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांच्या हस्ते करण्यात येईल. यावेळी अध्यक्षस्थानी माजी खासदार नाना पटोले राहतील. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य किशोर तरोणे, गंगाधर परशुरामकर, कांता पाऊलझगडे, प्रिती काळे, रवींद्र खोटेले, यमू ब्राम्हणकर, सुरेश हरिणखेडे, विश्वनाथ कापसे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक समितीने केले आहे..