तालुक्याची भूजल पातळी घटली,कलपाथरी,पालेवाडा पाणीटंचाई

0
17

गोरेगाव,दि.28 : तालुक्यात मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने ५ वर्षाच्या तुलनेत भूजल पातळीत १.१२ मीटरने घट झाली आहे. परिणामी पालेवाडा, कलपाथरी, तुमसर, दवडीपार येथे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. तर पाणी पुरवठा योजनेची कामे सुध्दा मंद गतीने सुरू असल्याने पाणी टंचाईच्या समस्येत वाढ झाली आहे.त्यातच कलपाथरी व पालेवाडा येथील महिलांना उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पाण्यासाठी दूरवर भटकंती करण्याची पाळी आली आहे.

तालुक्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत १०, मुख्यमंत्री पेयजल योजनेतंर्गत ७ अशा एकूण १७ पाणी पुरवठा योजनेची कामे सुरू आहेत.भूजल सर्वेक्षण विभागाने जानेवारी महिन्यात केलेल्या गोरेगाव तालुक्याची भूजल १.१२ मीटर ने खाली गेली आहे. तर एप्रिल, मे, जून महिन्यात भूजल पातळी पुन्हा खालावण्याची शक्यता आहे.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेची तुमसर, गिधाडी, गोंदेखारी, कमरगाव, सटवा येथे पाणी पुरवठा योजनेची कामे मंजूर आहेत.कडक उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण झाल्यास तालुक्यात पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कलपाथरी गावातील १३ बोअरवेल, ४ शासकीय विहिरी असून यापैकी ४ बोअरवेल बंद आहेत. त्यामुळे शाळेतील बोअरवेलवर पहाटेपासूनच पाणी भरण्यासाठी महिलांची रांग लागते. दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री पेयजल योजनेचे प्रस्ताव ग्रामपंचायतव्दारे देण्यात आले होते. तर जानेवारी महिन्यात या योजनेची कामे सुरू करण्यात आली.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनांची बाम्हणी, बाघोली, तिमेझरी, कुºहाडी, खाडीपार, बोडूंदा, मुंडीपार, पाथरी, तुमखेडा बु.,पालेवाडा येथे कामे सुरु करण्यात आले आहेत. तर मुख्यमंत्री पेयजल योजनेची दवडीपार, मुरदोली, पिंडकेपार, शहारवानी, कलपाथरी, पुरगांव, व सोनेगाव येथे कामे सुरु आहेत.