श्रीरामपूरवासीची रात्र जंगलातच जिल्हाधिकारीसह पालकमंत्र्यानी फिरवली पाठ

0
20
गोंदिया,दि.28: नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले. सोयीसुविधा मात्र पुरविण्यात न आल्याने कवलेवाडा, कालीमाती आणि झंकारदेवी येथील सहाशेच्यावर गावकèयांनी सोमवारला गावाकडे कूच केली होती.सोमवारी निघालेल्या या गावकèयाना पोलीस व वनविभाग प्रशासनाने तारेचे कुंपन लावून वाटेतच अडवल्याने सोमवार,मंगळवार व बुधवारचीही रात्रही त्यांनी जंगलातच काढावी लागली असून वनविभागाचे उपवनसरंक्षक व नवेगाव नागझिरा व्याघ्रप्रकल्पाचे संचालकाशिवाय जिल्हाधिकाèयानीही त्याठिकाणी जाऊन प्रकरण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलेला नाही.तर पालकमंत्री राजकुमार बडोले वृत्तलिहिर्पंयत पोचलेले नव्हते.तर श्रीरामपूरचे सरपंच भरत पंधरे हे आंदोलनस्थळावर हजर नसून आपण पालकमंत्र्यांना भेटायला चाललो असे सांगत होते.जेव्हा की भ्रमणध्वनीवरीलत्यांच्या आवाजासोबतच इतरांचे जे आवाज येत होते,त्यावरून सरपंचाना या आंदोलनापासून दूर करण्याचा प्रयत्न केले जात असल्याची शंका निर्माण झाली आहे.
उपवनसंरक्षक युवराज व नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्प संचालकानी श्रीरामपूर पुनर्वसितांना आपल्या मागण्या शासनाकडे पोचविल्या आहेत.त्या मंजूर करण्याचे अधिकार आमचे नसल्याने आम्ही फक्त आश्वासन देऊ शकतो काही करु शकत नाही असे चर्चा करतांना सांगितल्याने प्रकल्पग्रस्तांनीही जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही,तोपर्यंत न हटण्याचा निर्णय घेतला आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील कवलेवाडा, कालीमाटी, झंकारगोंदी हे ३ गाव वनपरिक्षेत्रात येत असल्यामुळे सन २०१२-१३ ला या ग्रामस्थांची पुनर्वसन  श्रीरामपूर  येथे करण्यात आले. मात्र. मोबदल्यात फक्त ८ लाख देण्यात आले आहे. उर्वरित २ लाख, शेती व पुनर्वसन प्रमाणपत्र टप्प्याटप्य्याने देण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले. मात्र, त्याला ७ वर्ष लोटूनही पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आपल्या बिèहाडासह आपल्या मूळ ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, जंगलात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना रोखण्यात आले. जो पर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होणार नाही तो पर्यंत परत जाणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
सन २०१२-१३ मध्ये त्यांना गावातुन बाहेर काढत कोहमारा-साकोली मार्गावरील सौंन्दड जवळील ठिकाणावर पुनवर्सन करण्यात आले. या गावाला श्रीरामपूर असे नामकरण आले. पोलीस कारवाईच्या भीतीने नागरिकांना नाईलाजस्तव पुर्नवसनाला विरोध असतानाही शेती, घर सोडून श्रीरामपूर येथे जावे लागले होते. जाहीरनामानुसार लक्ष देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्या आश्वासनाचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिक आणि आदिवासीनी आपल्या मुळ गावी परतण्याचा निर्णय घेतला असून आम्ही आपल्या भूमिकेवर कायम असल्याचे  श्रीरामपूरचे सरपंच भरत पंधरे यांनी सांगितले. मात्र, त्यांना वनविभागाने जंगलात जाण्यास मज्जाव केला आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.