27 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ गायमुख,प्रतापगडावर होणार महादेवाचा जयजयकार

गायमुख,प्रतापगडावर होणार महादेवाचा जयजयकार

0
59

महाशिवरात्री निमित्ताने सोमवारपासुन भव्य यात्रा
गोंदिया,दि.03ः-राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील अर्जूनी/मोर तालुक्यातील प्रतापगड,नागरा,बोळुंदा,पागंडी,सालेकसा,शशीकरण,भंडारा जिल्ह्यातील गायमुख,चांदपूर येथे सोमवारपासुन तारीख ४ मार्च महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेस्थळी शुक्रवार ता.१ मार्च पासून भाविक येत असून .त्यांच्या सोयी-सुविधेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
प्रतापगड येथे महादेवाची भव्य मूर्ती .असून .ख्वाजा उस्मान गनी हारूनी यांचा दर्गा आहे. एकात्मतेचे प्रतीक असलेल्या प्रतापगड येथे महाशिवरात्री निमित्त जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात.
सोमवारी (दि.४) रोजी खासदार प्रफुल्ल पटेल गायमुख येथे व वर्षा पटेल यांच्या ऊपस्थित प्रतापगड येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी खासदार मधुकर कुकडे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले. माजी खासदार नानाभाऊ पटोले मित्र परिवाराच्यावतीनेही महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. हाजी शेख दाऊतभाई.हाजी अब्दुल सत्तार रजवी.व ईतर ऊपस्थित राहतील.या ठिकाणी विविध प्रकारच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत
विशेष म्हणजे प्रतापगड येथे हिंदू धर्माचे र्शधास्थान भगवान शंकर व मुस्लिमांचा दर्गा असल्याने या यात्रेला हिंदू-मुसलमान एकतेचे प्रतीक म्हणून या यात्रेला विशेष महत्त्व आहे पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत विविध प्रकारच्या कार्यक्रम आयोजित केले जातात.