पोलीस अधीक्षकांनी केली दामिनी पथकाची स्थापना

0
19

गोंदिया,दि.11 : ८ मार्च हा दिवस देशात जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात आला. गोंदिया जिल्हा पोलिस दलातर्फे देखील महिला दिन अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून पोलिस अधीक्षक विनीता शाहू यांनी गोंदिया शहरात दामिनी पथकाची स्थापना केली आहे. या पथकात १ महिला पोलिस अधिकारी ५ महिला पोलिस कर्मचारी यांनी नेमणुक करण्यात आली आहे.
शाळा, महाविद्यालय इतर सार्वजनिक ठिकाणी युवती व महिलांची छेडखानी आणि त्यांना होणारा त्रास रोखण्यासाठी दिमीनी पथकाची स्थापना करण्यात आली. हे पथक शहरातील शाळा, महाविद्यालय, बसस्थानक , रेल्वेस्टेशन तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी गश्त करून छेडखाडीचे प्रकार समोर आल्यास टवळ्याखोरांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. व पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकारी यांना सुद्धा छेडखानी करणार्‍यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
प्रत्येक युवती व महिलांना स्वरक्षणासाठी तत्पर रहावे, यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थीनी मार्गदर्शन करणार आहे. व गोंदिया जिल्हा पोलिस दल सैदव महिलांच्या मदतीसाठी २४ तास सज्ज राहतील. पीडितांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक १0९१, व्हॉट्सअप नंबर ९१३00३0५४८ व ९१३00३0५४९, नियंत्रण कक्ष क्र. १00 किंवा दामिनी पथकाच्या प्रभारी संगीता जाधव ९९२३५८९0४३ यांच्याशी संपर्क साधवा किंवा त्यांच्या जवळच्या पोलिस स्टेशन येथे माहिती कळवावी, असे अवाहान पोलिस अधीक्षक विनीता साहू यांनी केले आहे