पीएसआयच्या परीक्षेत साकोलीचा श्रीकांत राज्यात सातवा

0
19

साकोली,दि.11ः-एमपीएससीच्या पीएसआय परीक्षेत श्रीकांत लांजेवार हा ओबीसी प्रवर्गातून राज्यात १७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. येथील सामान्य कुटुंबातील श्रीकांत उदाराम लांजेवार हा एमएससी कृषी असून, त्याने आपले शिक्षण राहुरी कृषी विद्यापीठातून पूर्ण केले. शालेय शिक्षणापासूनच त्याला एमपीएससी व स्पर्धा परीक्षेचे आकर्षण होते. पदवी परीक्षा झाल्यानंतर त्याने पुणे येथे राहून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. त्याचे वडील उदाराम लांजेवार हे नंदलाल पाटील कापगते विद्यालयात परिचर आहेत. तर आई प्रमिला उदाराम लांजेवार या गृहिणी आहेत. त्याची लवकरच नाशिक येथे प्रशिक्षण पूर्ण होऊन तो राज्य सेवेत दाखल होणार आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, मामा जि. प. सदस्य डॉ.अशोक कापगते व गुरुजनांना दिले आहे.
यशाबद्दल माजी खासदार नाना पटोले, माजी आ. डॉ. हेमकृष्ण कापगते, आ. बाळा काशीवार, मुख्याध्यापक एम. झेड. शहारे, डॉ. सी. जे. खुणे, डॉ. एल.पी. नागपूरकर, डॉ. हरिश्‍चंद्र बोरकर, लालाजी गायकवाड, सुधाकर कापगते, चांगदेव मुंगमोडे, मीनानाथ लांजेवार, आशीष खुणे, सतीश डोंगरवार, महेश हातझाडे, कौशल्या कापगते व रमेश कापगते यांनी अभिनंदन केले आहे.