41.1 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home विदर्भ पांजरा येथे घराला लाग,आ.रहागंडालेंनी दिली भेट

पांजरा येथे घराला लाग,आ.रहागंडालेंनी दिली भेट

0
64

तिरोडा,दि.14ः- तालुक्यातील पांजरा येथील माजी सरपंच युवराज मोहन धार्मिक यांच्या घराला (दि.१२) सकाळी ७ वाजता अचानक आग लागली. दरम्यान, गावातील नागरिकांनी धाव घेऊन आगीला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यातच अग्निशमन पथकालाही पाचारण करण्यात आले. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, तोपयर्ंत जवळपास २ लाख रुपयांचे नुकसान झाले.
पांजरा येथील माजी सरपंच युवराज धार्मिक यांच्या घराला आज सकाळी ७ वाजता सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच गावकर्?यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी कशोसीचे प्रयत्न सुरू केले आहे. त्यातच अग्निशमन पथकालाही पाचारण करण्यात आले होते.घटनेची माहिती मिळताच आमदार विजय रहागंडाले यांनी भेट देऊन पाहणी केली.
नागरिक आणि अग्निशमन पथकाच्या अथक पर्शिमाने आगीला आटोक्यात आणण्यात आले. तोपयर्ंत घरातील काही साहित्य जळून खाक झाले. एकंदरीत या घटनेत जवळपास २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच तलाठी मलेवार यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. विशेष म्हणजे, या घटनेत कसलीही जीवित हानी झाली नाही. मात्र, जनावरांसाठी साठवून ठेवलेला सुखा चाराचा साठा जळून खाक झाला.