
गोंदिया-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी आघाडीच्यावतीने उद्या बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.राज्यातील भाजप सेना सरकारने ओबीसी विद्याथ्र्यांच्या शिष्यवृत्तीसह ओबीसी क्रिमीलेयरची मर्यादा साडे चार लाख ठेवल्याच्या विरोधात हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.विधानसभेत क्रिमीलेयरची मर्यादा ६ लाख देण्याची घोषणा केल्यानंतर साडे चार लाखाचे शासन निर्णय काढून राज्यातील ओबीसी समाजाची फसवणूक भाजप सेना सरकारने केल्याच्या विरोधात हे आंदोलन असल्याची माहिती ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांनी दिली आहे.तसेच या धरणे आंदोलनात ओबीसी समाजातील विद्यार्थी,पालक,शेतकरी आदी समाजबांधवाना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विनोद हरिणखेडे, बबलू कटरे,गंगाधर परशुरामकर,सुनील पटले आदींनी केली आहे.