कार्यकर्त्यांनो, एकदिलाने पक्षाचे कार्य करा- नीलय नाईक

0
14

भंडारा : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका डोळयांसमोर ठेवा. सर्वकार्यकर्त्यांनी हेवेदावे विसरुन एकदिलाने पक्षासाठी काम करावे. पक्ष संघटन मजबूत करून पक्ष मोठा करा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी नीलय नाईक यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे निवडणूक अधिकारी दिलीप वळसे पाटील यांनी नीलय नाईक यांची भंडारा जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी म्हणून निवड केली.
नाईक यांनी निवड झाल्यानंतर प्रथमच जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी पक्षांतर्गत निवडणूका होण्यासंबंधी भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली.
यावेळी पक्षांतर्गत होणार्‍या निवडणुकीचा कार्यक्रम घेण्याबाबतच्या सूचना पदाधिकार्‍यांना दिल्या. त्यात वॉर्ड समिती, ग्राम समिती, ब्लॉक समिती, विधानसभा मतदार संघ, राष्ट्रवादी काँग्रेस समिती, जिल्हा समिती, शहर, जिल्हा समितीच्या निवडणूका घेण्यासंबंधी मार्गदर्शन केले.
यावेळी भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, नगराध्यक्ष भंडारा बाबुराव बागडे, नगराध्यक्ष तुमसर अभिषेक कारेमोरे, प्रदेश उपाध्यक्ष मधुकर सांभारे, प्रदेश सचिव अविनाश ब्राह्मणकर, माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे, धनंजय दलाल, नरेंद्र झंझाड, नितीन तुमाने, जिल्हा परिषद सदस्य ज्योती टेंभुर्णे, नलिनी कोहळे, मीना कुरंजेकर, प्रमिला साकुरे, महेंद्र गडकरी, सुमेध शामकुवर, आनंद बोदीले, गुणवंत काळबांधे, देवचंद्र ठाकरे, बाळु चुóो, वासु बान्ते, लोमेश वैद्य, डॉ. विकास गभणे, अंजराज समरित, हितेश सेलोकर, विजय पारधी, वामन बोकडे, अनिल लांजेवार, ईश्‍वर कळंबे, रामरतन वैरागडे, वामन शेंडे, नागेश वाघाये व अनेक कायकर्ते व पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.