24.6 C
Gondiā
Saturday, August 22, 2026
Home विदर्भ क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम रविवारला

क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम रविवारला

0
38

समाज प्रबोधन व गोंडी नृत्याचे आयोजन
आमगाव,दि.16 : क्रांतिसूर्य बिरसा मुंडा उत्सव समिती सोनेखारीच्या वतीने उद्या, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता सोनेखारी येथे महामानव बिरसा मुंडा जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घघाटन आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते माजी आमदार संजय पुराम यांच्या अध्यक्षतेत करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे ध्वजारोहण माजी आमदार रामरतनबापू राऊत तर प्रमुख अतिथी म्हणून कृउबास सभापती रमेश ताराम, संचालक विनोद कन्नमवार, माजी सभापती दामोदर नेवारे, नागपूरचे वन परिक्षेत्र अधिकारी ए.के.मडावी, सरपंच संजयमालाताई हटवार, जि.प.सदस्य जियालाल पंधरे, प.स.सदस्य हरविलाताई मडावी, गटशिक्षणाधिकारी वाय.सी.भोयर, माजी सभापती हनवत वट्टी, इंद्रकुमार रहांगडाले, भैय्यालाल सिंदराम, फ त्तुजी गाते तर प्रमुख वक्ते म्हणून चेतन ऊईके, मधु दिहारी आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाप्रसंगी सायंकाळी प्रबोधन व गोंडी नृत्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  परिसरातील नागरिकांनी मोठ्याा संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहन यांच्या  बिरसा मुंडा जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.