24.6 C
Gondiā
Saturday, August 22, 2026
Home विदर्भ सोनपूरी येथे राष्ट़ीय विधी सेवा दिन कार्यक्रम

सोनपूरी येथे राष्ट़ीय विधी सेवा दिन कार्यक्रम

0
40

 गोंदिया,दि: 15. : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय, जिल्हा वकील संघ गोंदिया तसेच ग्रामपंचायत सोनपूरी यांचे संयुक्त वतीने नुकतेच 9 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमीत्त ग्रामपंचायत सोनपूरी येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास माने यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पाडण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सोनपूरीच्या सरपंच श्रीमती रेखाताई ठाकरे उपस्थित होत्या.

प्रारंभी जिल्हा परिषद शाळा सोनपूरी येथील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक श्री.हरिणखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली कायद्याचे संदर्भात हात फलके घेवून गावात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीत गोंदिया येथील सर्व न्यायीक अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी, विधी स्वयंसेवक, ग्रामपंचायत सोनपूरी येथील सर्व सदस्य तसेच गावकरी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेवून कायद्याचे फलकाद्वारे प्रचार व प्रसार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा नवेगाव येथील विद्यार्थ्यांनी कौटुंबिक हिंसाचार या विषयावर लघुनाटिका सादर केली.

यावेळी सह दिवाणी न्यायाधीश एन.आर.वानखेडे यांनी मानवाधिकार व संविधानिक अधिकार या विषयावर, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच अध्यक्ष पी.बी.योगी यांनी ग्राहक तकार निवारण कायदा या विषयावर, सह दिवाणी न्यायाधीश व्ही.आर.मालोदे यांनी राष्ट्रीय विधी सेवा कायदा या विषयावर व माजी जिल्हा सरकारी वकील बीना बाजपेई यांनी राष्ट्रीय विधी सेवा (नालसा) योजना आणि मोफत विधी कायदा या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास माने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विधी सेवा विषयावार उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला गोंदिया येथील सर्व न्यायीक अधिकारी, ॲड. सुजाता तिवारी, ॲड.अर्चना नंदघळे, ॲड.हेमलता पतेह, ॲड.प्रणिता कुलकर्णी, ॲड.अलका बोकडे, ॲड.रंजिता शुक्ला, ॲड.रमाशंकर राय, ॲड.ए.पी.चतुर्वेदी, ॲड.सुनिता चौधरी, गोंदिया न्यायालयातील कर्मचारी तसेच विधी स्वयंसेवक, ग्रामपंचायत सोनपूरी येथील सर्व सदस्य, जि.प.प्राथमिक व माध्यमिक शाळा सोनपूरी व नवेगाव येथील शिक्षकवृंद व विद्यार्थी तसेच सोनपूरी व आजुबाजूच्या गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संचालन ॲड.मंगला बन्सोड यांनी केले. उपस्थितांचे आभार ग्रामपंचायत सोनपूरीचे सचिव जी.सी.ठाकूर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर.जी.बोरीकर, जी.सी.ठवकर, एस.एम.कठाणे, पी.एन.गजभिये, एल.पी.पारधी, एस.एस.पारधी, डी.डी.मेश्राम यांनी सहकार्य केले.