सडक अर्जुनी,दि.17ः-दक्षिण पुर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातंर्गत येत असलेल्या सौंदड रेल्वे स्थानकाला भेट देत रेल्वेस्थानक परिसर व तेथील समस्यांचा आढावा घेतला.तसेच सौंदड रेल्वेस्थानकावर दोन्ही कडेला प्रवाशांना ये जा करण्यासाठी पादचारी पुलाची मागणी लक्षात घेत रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पादचारी पुलाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना दिल्या.तसेच सौंदड जिल्हा परिषद क्षेत्रातील इतर विषयावर व समस्यावर खासदार सुनिल मेंढे यांनी बैठक घेतली.यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती अशोक लंजे, लायकराम भांडारकर,गिरीधारी हत्तिमारे,शेषराव गिरेपुंजे,विजय बिसेन,हर्ष मोदी व क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.शेतकर्यांना धान खरेदी केंद्रावर धान देण्याचे आवाहन केले.





