गोरेगाव,दि. १८ः शेतकरी हितासाठी पंतप्रधान शेतकरी सन्मानविधी योजना सुरू केली गेली. या योजनेसाठी गोरेगाव तालुक्यातील १४ हजार ५८२ शेतकरी पात्र ठरले.मात्र जबाबदार अधिकारी, कर्मचार्यांच्या निष्काळजीपणामुळे १० महिन्यांचा कालावधी लोटूनही ७ हजार ६६१ शेतकर्यांच्या बँक खात्यात पहिला हप्ता २ हजार रूपये जमा करण्यात आला नाही. पंतप्रधान शेतकरी सन्माननिधी योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी केंद्र शासनाने जिल्ह्याधिकारी व तहसीलदारांना सोपविली. त्यामुळे तालुक्यात तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी सर्वेक्षण करून १८ हजार ३१३ शेतकरी लाभाथ्र्यांच्या यादीसह आवश्यक असलेल्या दस्तऐवजाची सत्यप्रत,दुय्यम प्रत तहसीलदारांना दिली. यातून ३ हजार ७३१ शेतकर्यांना अपात्र ठरविण्यात आले. १४ हजार ५८२ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. परंतु, अधिकारी, कर्मचार्यांच्या निष्काळजीपणामुळे ७ हजार ६६१ गरजू पात्र
लाभार्थी शेतकर्यांच्या बँक खात्यावर पहिला हप्ता २ हजार रूपये जमा करण्यात आला नाही. ही घोडचूक सर्वेक्षण करणार्या तलाठी, ग्रामसेवक कृषी सहायक यांची की, शेतकNयांची असा प्रश्न शेतकर्यांनी उपस्थित केला आहे.




