39.4 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ मोटार वाहन निरीक्षक यांच्या तालुकानिहाय मासिक शिबीराच्या तारखा जाहीर

मोटार वाहन निरीक्षक यांच्या तालुकानिहाय मासिक शिबीराच्या तारखा जाहीर

0
27

वाशिम, दि. २६ : जिल्ह्यातील मोटार वाहन चालक, मालक यांच्या सोयीसाठी  उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक यांच्या उपस्थितीत वाहन कर वसुली, मोटार वाहन नोंदणी, तपासणी, वाहन चालक अनुज्ञप्ती कामकाजासाठी मासिक शिबीर आयोजत करण्यात येते. त्यानुसार जानेवारी ते जून २०२० या कालावधीतील मासिक शिबिरांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.कारंजा येथे ३ व २१ जानेवारी, ४ व १८ फेब्रुवरी, ४ व २० मार्च, ४ व २१ एप्रिल, ४ व १८ मे, ४ व १९ जून रोजी, रिसोड येथे ९ जानेवारी, ७ फेब्रुवारी, ७ मार्च, ७ एप्रिल, ८ मे आणि ९ जून रोजी, मानोरा येथे १४ जानेवारी, ११ फेब्रुवारी, १३ मार्च, १५ एप्रिल, ११ मे आणि १२ जून रोजी, मंगरूळपीर येथे १७ जानेवारी, १४ फेब्रुवारी, १७ मार्च, १७ एप्रिल, १४ मे आणि १६ जून रोजी मासिक शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. यापैकी कोणत्याही दिवशी शासकीय सुट्टी जाहीर झाल्यास दुसऱ्या कार्यालयीन दिवशी शिबिराचे आयोजन करण्यात येईल. सकळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील, असे वाशिम उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.