28.9 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home विदर्भ कोकणा येथे संविधान साक्षर ग्राम उपक्रमाची सांगता

कोकणा येथे संविधान साक्षर ग्राम उपक्रमाची सांगता

0
31

सडक/अर्जुनी,दि.27ः-: शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),च्या समतादूत प्रकल्पाच्या वतीने संविधान दिनानिमित्त “संविधान साक्षर ग्राम” उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.महाराष्ट्रात समतादूत सामाजिक समतेच्या विचाराचा जागर करतात, त्याचाच एक भाग म्हणून एका महिन्यात 100% संविधान साक्षर ग्राम कास धरुन लोकशाहीचा प्रचार करुण या संकल्पनेतून या उपक्रमाचे उदघाटन संविधानदिनी करण्यात आले होते.यासाठी कोकणा गावाची निवड करण्यात आली होती.या गावात संविधान साक्षर ग्राम उपक्रम यशस्वी झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर,रमेश चु-हे,सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मंगेश वानखेडे,लक्ष्मीकांत धानगाये,कविता रंगारी,शिला भेंडारकर,दयानंद कोरे (पो.पाटील कोकणा),कालसर्पे मॅडम,राउत मॅडम, पेंदाम(केंद्र प्रमुख)उपसरपंच शिवाजी गहाणे,खेमराज भेंडारकर,आशाताई ठाकरे,गौतमा खोब्रागडे,योगिता ब्राम्हणकर(प्र.अ.गोंदिया), समतादूत राजरत्न मेश्राम,महेंद्र कटबारिये,साजन वासनिक उपस्थित होते.संचालन समतादूत संदेश ऊके यांनी केले तर आभार शिवाजी गहाणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकमान्य टिळक विद्यालय कोकणा,श्रीकृष्ण आदि आदिवासी आश्रम शाळा कोकणा,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकणा सर्व शिक्षक वृन्द व गावकरी मंडळी यांनी विशेष सहभाग घेतला.