28.5 C
Gondiā
Tuesday, June 23, 2026
Home विदर्भ सोनाली सहारेंचा भावस्पर्श काव्यसंग्रहाचे प्रकाशन

सोनाली सहारेंचा भावस्पर्श काव्यसंग्रहाचे प्रकाशन

0
34

नागपूर,दि.२८ः मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने एक माध्यान्ह प्रेमाची या कार्यक्रमांतर्गत ब्रम्हपूरी येथील सोनाली सहारे(रायपूरे)यांच्या भावस्पर्श काव्यसंग्रहाचे प्रकाशन जेष्ठ कवी ज्ञानेश वाकुडकर यांच्या हस्ते करण्यात आले.हा कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात पार पडला.कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून डॉ.अनिल पावशेकर उपस्थित होते.तर अध्यक्षस्थानी डॉ.पदमा जाधव होत्या.कार्यक्रमाला जेष्ठ कवी प्रा.ज्ञानेश वाकुडकर,डॉ.सोहन चवरे(जिल्हाध्यक्ष, कास्ट्राईब जि.प.कर्मचारी संघटना,नागपूर),योगीता गायकवाड,मनोज मोहिते,संग्राम कुमटेकर,नागोराव कोम्पलवार,प्रविण मुधोळकर,परसराम गोंडाणे,श्रीराम केदार,दीपक गिरधर, उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार लोकमत ता.प्र.रामटेके