भाजप नेते पुरुषोत्तम वासुदेव वशिष्ठ यांचे निधन...
गोंदिया-जिल्ह्यातील ज्येष्ठ भाजप नेते पुरुषोत्तम वशिष्ठ यांचे 7 जानेवारीला वृध्दापकाळाने निधन झाले.वशिष्ठ हे पूर्व विदर्भात जनसंघाचे नेते म्हणून ओळखले जायचे. गोंदिया – भंडारा जिल्ह्यात भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते.सालेकसा पंचायत समितीचे 11 वर्ष सभापती राहिले.स्व.लक्ष्मणराव मानकर आणि प्रा. महादेवराव शिवणकर यांच्या सोबत भाजपला रुजवण्यात त्यांचा वाटा होता.त्यांच्या पार्थिवावर सालेकसा येथे आज(दि.8) अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी माजी मंत्री भरतभाऊ बाहेकर, माजी आमदार भेरसिंग नागपुरे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
शेवतांबाई फुंडे यांचे निधन
तुमसरःराष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभा भंडारा जिल्हाध्यक्ष समाजसेवी विश्वजीत फुंडे मु. मांगली(तुमसर) यांच्या मातोश्री शेवंताबाई जीवतुजी फुंडे यांचे आज 8 जानेवारीला निधन झाले.त्यांच्यावर मांगली येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी मोठ्यासंख्येने समाजबांधव उपस्थित होते.




