36.5 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home विदर्भ ओबीसी जनगणना जागृती मोहीमेला अर्जुनी मोरगावातून होणार सुरवात

ओबीसी जनगणना जागृती मोहीमेला अर्जुनी मोरगावातून होणार सुरवात

0
26
अर्जुनी मोरगाव,दि.16ः- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने आयोजित बैठकित 5 फेब्रुवारी 2020 पासून सुरू होणाऱ्या ओबीसी जनगणना जागृती अभियानावर चर्चा करण्यात आली.तसेच अर्जुनी मोरगाव येथून या ओबीसी जनगणना अभियान मोहिमेचा शुभारंभ करण्याचा निर्णय घेण्यात आला.बैठकीला ओबीसी संघर्ष कृती समिती गोंदिया जिल्हा अध्यक्ष बबलू कटरे उपस्थित होते.यावेळी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुनील तरोने, छावा संग्राम परिषदेचे अध्यक्ष नीलम हलमारे, सडक-अर्जुनी तालुका अध्यक्ष दिनेश हुकरे, जि प सदस्य किशोर तरोणे,  बैठकीचे संयोजक उद्धव मेहंदळे सुभाष देशमुख, राधेश्याम भेंडारकर, चंद्रशेखर नाकाडे, श्रीधर हटवार, अश्विन सिंह गौतम, लोकपाल गहाणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत ओबीसी जनगणना जागृती अभियान अंतर्गत दिनांक 5 फेबुवारीला मोरगाव अर्जुनी वरून सुरू होणाऱ्या अभियानाची रूपरेषा तयार करण्यात आली.