गोंदिया,दि.24-ःशेती आणि शेतकरी हा माझ्या समाजकारण आणि राजकारणातला जिव्हाळ्याचा विषय आहे.लोकसभेचा खासदार, नंतर अखिल भारतीय काँग्रेस कृषी आघाडीचा अध्यक्ष म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी नेहमीच कटिबद्ध राहिलो आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेने किमान समान कार्यक्रम निश्चित करून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. या सरकारच्या केंद्रस्थानीदेखील शेतकरीच आहे,असे उद्गार महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी काढले.
युवा कुणबी समाज सेवा समिति साकरीटोलाच्या वतीने आयोजित कुणबी समाजाचा अधिवेशन व सत्कार कार्यक्रम सोहळ्यात पटोले बोलत होते.कार्यक्रमाची सुरुवात राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, संत तुकोबाराय, क्रांतिज्योति सावित्रीबाई यांच्या चित्रासमोर दीपप्रज्वलन व पुष्प अर्पित करून करण्यात आले.श्रीविद्या गर्ल्स हाईस्कूलच्या विद्यर्थिनीनी सुंदर असे स्वागत गीत प्रस्तुत केले,
पटोले पुढे म्हणाले की,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी, बेरोजगार तरुण या सर्वच घटकांचे प्रश्न निश्चितपणे मार्गी लागतील, अशी ग्वाही दिली.सर्व समाज बांधवासाठी युवा कुणबी समाज सेवा समिति अनेक वर्षापासून प्रेरणादायी ठरत आहे मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमात आलो याचा मला अत्यानंद होत आहे, असे बोलून सत्कार मूर्ति नानाभाऊ पटोले यांनी समितिला भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे उद्धघाटन वरिष्ठ समाजसेवी काशीरामभाऊ शिवनकर यांचे अध्यक्षतेखाली माजी जि.प.अध्यक्षi उषाताई मेंढे यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी विजय बहेकार, अमर वराड़े, लताताई दोनोडे जि.प. सभापती, कल्पनाताई बहेकार, इंदुताई कोरे अध्यक्ष महिला आघाडी, तुकाराम बोहरे, भूमेश्वर मेंढे, प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होते.समितीचे प्रभाकर दोनोडे, रमेश चुटे,कमलबापू बहेकार, युगराम कोरे, राजू काडे, डॉ. संजय देशमुख, देवराम चुटे, पुर्थ्वीराज शिवनकर,पुरुषोत्तम कोरे, देवराज खोटेले, संतोष बोहरे,अरविंद फुंडे,रेखा फुंडे, वंदना काले, रामदास हत्तीमारे, टी.जी.फुंडे, योगेश बहेकार यांनी स्मृति चिन्ह प्रदान करून नानाभाऊ यांचा सत्कार केले.याप्रसंगी समाजातील गुणवंत विद्यर्थि तसेच 15 यशवंत युवकाना स्मृति चिन्ह भेंट करून पटोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्तविक वाचन प्रभाकर दोनोडे यांनी, तर सूत्र संचालन समितिचे अध्यक्ष देवराम चुटे यांनी केले.उपस्थिताचे आभार सचिव पुर्थ्वीराज शिवनकर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैशाली मेंढे, माया चुटे, टीना चुटे, अजया चुटे, किरण कोरे, स्वाति फुंडे नामदेव दोनोडे, नीलकंठ दोनोडे, मुकेश फूंडे नंदू चुटे, शामलाल दोनोडे, सर्व समाज बांधवानी अथक परिश्रम घेतले.





