भंडारा,दि.30 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते व खासदार प्रफुल पटेल यांना भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने धान उत्पादक शेतकèयांचे धान खरेदीबाबत, धान खरेदी केंद्र नव्याने सुरु करणे, केंद्रावर बारदाना पुरविणे व राईसमील मालकांनी मिलींग केलेले तांदळाची उचल तातडीने करण्याबाबतचे निवेदन मुंबई येथे देण्यात आले. त्यावेळी तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे, जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे माजी खा. मधूकर कुकडे, प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल, विवेकांनद कुर्झेकर, दयानंद नखाते, सोनू खोब्रागडे, रुपेश खवास, ईश्वर कळंबे, संतोष हटवार उपस्थित होते. प्रफुल्ल पटेल यांनी सदर प्रकरणी महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, भंडारा जिल्हयाचे पालकमंत्री विश्वजीत कदम व अन्न व नागरी पुरवठा सचिव महेश पाठक यांच्याशी सुध्दा चर्चा केली. सदर प्रकरणी राईसमील मालकांनी मिलींग केलेले तांदूळ दुसèया जिल्हयामध्ये पाठविण्याकरिता व धान केंद्रावर खरेदी केलेले धान उचल करण्याबाबत व धान खरेदी केंद्र सुरु करुन केंद्राना बारदाना पुरवठा करण्याचे निर्देश संबधित अधिकाèयांना देण्यात आले आहे





