38 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ संविधानिक अधिकार मिळविण्यासाठी जनगणेवर बहिष्कार घाला-खेमेंद्र कटरे

संविधानिक अधिकार मिळविण्यासाठी जनगणेवर बहिष्कार घाला-खेमेंद्र कटरे

0
30

आमगाव,दि०२ः-स्वातंत्र्यपूर्व काळात सुविधांचा अभाव असताना इंग्रज या देशातील नागरिकांची जातीनिहाय जनगणना करू शकतात,तर सध्याच्याकाळात सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध असताना ओबीसींची जनगणना करण्यास का टाळाटाळ केली जाते.याचा विचार करून आपल्याला संविधानाने दिलेले अधिकार मिळवायचे असतील तर आपली जनगणना करण्यासाठी दबावतंत्राचा वापर करून जनगणना सरकार करत नसेल तर बहिष्कार घालत प्रगणकाला परत पाठविण्याची तयारी समाजबांधवांनी ठेवावी असे आवाहन राष्ट्रीय पोवार क्षत्रिय महासभेचे संघटन सचिव खेमेंद्र कटरे यांनी केले.ते साखरीटोला राजाभोज पोवारसंघ द्वारा आयोजित राजभोज जयंतीउत्सव कार्यक्रमात कवडी येथे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोतनभाऊ रहागंडाले तर उद्घाटक म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य ओ.सी.पटले उपस्थित होते.शोभायात्रा शुभारंभ अतिथी म्हणून आमगाव पोवार समाज संघटनेचे सचिव राजूभाऊ पटले यांच्यासह माजी उपसभापती जयकृष्ण रहागंडाले,सरपंच किशोर रहागडाले,माजी सरपंच नोहरलाल चौधरी,रवीलाल ठाकरे,नानू बिसेन,उपसरपंच विनोद ठाकरे,अज्जू रहागंडाले,सरपंच इंदिरा चौधरी,ढिवरु शरणागत,उपसरपंच देवेंद्र अंबुले,रामू कटरे,,सरपंच सुनीताबाई तुरकर,लक्ष्मण राणे,शामशंकर बघेले,द्वारकाबाई पटले,नीलाबाई ठाकरे,दुर्गेश्वरीबाई बोपचे,विमलताई कटरे, चंद्रकांताबाई रहागंडाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमापूर्वी गावात शोभायात्रा काढण्यात आली.शोभायात्रा कार्यक्रमस्थळी पोचल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोरील जागेवर चक्रवर्ती राजाभोज यांच्या प्रतिमेकरीता भूमिपूजन करण्यात आले.त्यानंतर कार्यक्रमात पोवार समाजरत्न पुरस्कार देऊन अवयवदान करणारे स्व.रेव्यानि रहगांडाले व स्व. गणेश पटले यांच्या कुटुंबीयांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.blank
पुढे बोलताना कटरे म्हणाले की हजारोवर्षापुर्वी आपल्या समाजाची जी परिस्थिती होती,ती आजच्या घडीला तशी नाही.आपण लढवय्ये समाजाचे असलो तरी सध्याच्या परिस्थितीत आपल्या गावखेड्यातील समाजबांधवाच्या राहणीमानातील सर्व परिस्थितीचा विचार केल्यास आपण ओबीसी प्रवर्गात मोडत असून मागासलेले आहोत.त्यामुळे आपल्याला प्रगतीसाधावयाची असेल तर सqवधानिक पद्धतीने लढाई लढून आपल्या समाजाती जातीनिहाय जनगणना करण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण करावा लागेल.जोपर्यंत आपली जनगणना होणार नाही,तोपर्यंत आपली संख्या निश्चित होणार नाही.संख्या निश्चित नसली की सरकारही त्यावर विकासाचे नियोजन करीत नाही,याकरिता आपली जनगणना होणे गरजेचे आहे.सोबतच आपल्या बोलीभाषेला भाषेच्या यादीत स्थान मिळवून देण्यासाठी पोवारी भाषेचाही उल्लेख जनगणनेतील भाषेच्या रकान्यात व्हायला हवे असे विचार व्यक्त केले.सोबतच राजाभोज जयंतीउत्सव कार्यक्रम हा समाजापुरता मर्यादित न ठेवता यात सर्व समाजाला सामावून घेत सर्वसमावेशक करावा जेणेकरून गावातील सर्वसमाजासोबत आपले संबंध एकोप्याचे निर्माण होतील आणि उच्चवर्णीयांच्या कटकारस्थानाला संघटितपणे लढा देता येईल.
याप्रसंगी बोलताना कार्यकमाचे उद्घाटक सेवानिवृत्त प्राचार्य ओ.सी.पटले यांनी सम्राट विक्रमादित्यापासून ते चक्रवर्ती राजाभोज यांच्यापर्यंतच्या इतिहासाची माहिती देत राजा भोज यांच्या कार्याची माहिती दिली.तसेच आपला पोवार समाज हा कशापध्दतीने वैनगंगा व वर्धा तटीय भागात स्थायी झाला याबद्दल सविस्तर विवेचन करीत नागपूरचा राजा बख्त बुलंदशहा यांना औरगंजेबावर विजय मिळवून देण्यात आपल्या समाजाचा असलेल्या मोठ्या वाट्यामुळेच जमीनदारी व महाजनकी आपल्या समाजातील लोकांना मिळाल्याचे सांगितले.यावेळी शोभायात्रा शुभारंभप्रमुख आमगाव तालुका पोवार संघटनेचे सचिव राजुभाऊ पटले यांनी समाजाच्या विकासासाठी शिक्षणासोबतच मुलामुलींच्या व्यवहाराकडे लक्ष देणे गरजेचे असून यात सर्वांत मोठी भूमिका ही आईची असल्याचे सांगितले.दिपप्रज्वलक माजी उपसभापती जयकृष्ण रहागंडाले यांनी समाजातील कुठल्याच व्यक्तीच्या मुलामुलींने जर आंतरजातीय विवाह केले तर त्याचा प्रपोगंडा करण्याएैवजी संबधिताच्या पालकासोबत राहून भविष्यात अशा घटना घडू नये याकडे लक्ष द्यावे.त्याचप्रमाणे आपल्या समाजातील व्यक्ती पुढे जात असेल तर त्याला सहकार्य केल्यास समाजाचा विकासात भर पडेल असे विचार मांडले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वरिष्ठ समाजसेवी पोतनभाऊ रहागंडाले यांनी राजाभोज जयंतीच्या माध्यमातून समाजाला संघटित व एकत्रित करण्याचे काम चांगले होत असून समाजाने एकोप्याने राहून विकास करावा असे आवाहन केले.कार्यक्रमाचे संचालन जियालाल पारधी व मनोज शरणागत यांनी केले.आयोजनासाठी अंजोरा,पानगाव,कवडी,वडद-कटंगटोला,कारुटोला,तेलीटोला,जैतुरटोला,येरमडा,रामपूर,रामाटोला व साखरीटोला येथील समाज संघटनांसह राजाभोज पोवारसंघ समितीचे पदाधिकारी फत्तुलाल बघेले,हरिभाऊ कटरे,मनोज शरणागत,जियालाल पारधी,रेखलाल गौतम,प्रतिम चव्हाण,तेजलाल ठाकरे,चंद्रशेखर बिसेन आदींनी सहकार्य केले.राष्ट्रगितांने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.