33.9 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ आशा सेविकांमुळे बालक मृत्युदर झाले कमी – आ. विनोद अग्रवाल

आशा सेविकांमुळे बालक मृत्युदर झाले कमी – आ. विनोद अग्रवाल

0
31
गोंदिया,दि.02ःसमाजातील गर्भवती महिला आणि त्यांच्या संगोपनाची जबाबदारी असा सेविकांवर असते आहे ते योग्य रीतीने पार पाडत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बालमृत्यू आणि गर्भवती महिलांचा मृत्यू अत्यंत घट झालेली आहे. याचं सर्वस्वी श्रेय आशा सेविकांना जातो. त्यांनी त्याचे कार्य बजावून फक्त नौकारीच नाही केली तर माणुसकी धर्म सुद्धा निभावला आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत नागरिकांना अत्यल्प खर्चात योग्य सेवा प्रदान केली जात आहे. असे विधान आमदार विनोद अग्रवाल यांनी केले. ते तालुका नियंत्रण पथक आयोजित “आशा दिवस” निम्मित बोलत होते.
नागरिकाचं सेवेत 24 तास तत्पर असणाऱ्या आशा सेविकांसाठी आजचा दिवस म्हणजे सुप्त कलागुणांना चालना मिळण्यासाठी आहे. इतर दिवशी त्यांचे कर्तव्य बजावत असताना त्यांना स्वतःमधील गुणांसाठी कौशल्यासाठी वेळ मिळत नसल्याने त्यांची इच्छा असून देखील मंच मिळत नाही. मात्र आजच्या कार्यक्रमामुळे त्यांना आपले कलागुण दाखवण्याची संधी मिळालेली आहे. त्यांनी या संधीचे सोनं करून विविध स्पर्धेत भाग घेण्याचे आव्हान आमदार विनोद अग्रवाल यांनी केले.
आशा दिवस निमित्त पाककला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, सामान्य ज्ञान आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर श्याम निमगडे यांनी केले तर अध्यक्षस्थानी सभापती माधुरी हरिणखेडे व उपसभापती चमन बिसेन उपस्थित होते.बक्षीस वितरण कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार विनोद अग्रवाल हे तर अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य खुशबू टेंभरे होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सभापती शैलजा सोनवणे आदी मंडळी मंचावर उपस्थित होती. कार्यक्रमाचे आयोजन तालुका आरोग्य अधिकारी वेद प्रकाश चौरागडे यांनी केले होते.गर्भवती महिलांना बीजीडब्ल्यू 105 माध्यमातून रुग्णालयात घेऊन गेल्यावर त्या ठिकाणी आशा सेविकांना थांबण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसते. त्यामुळे आशा सेविकांची गैरसोय होते. यासाठी आशा भवन प्रत्येक जिल्हा रुग्णालयात उभारण्याची मागणी केली आहे. त्यावर शासनापर्यंत मागणी पोहोचवून पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार विनोद अग्रवाल यांनी दिले.