33.9 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ दोन आमदारांसह जि.प.चे माजी पदाधिकारी निर्दोष

दोन आमदारांसह जि.प.चे माजी पदाधिकारी निर्दोष

0
86

जि.प.सीईओला कोंबून ठेवल्याचे प्रकरण
गोंदिया दि.7:-: डिसेंबर २०१२ मध्ये जि.प.चे तत्कालीन सीईओ गेडाम हे मनमर्जीने काम करतात, पदाधिकार्‍यांना विश्वासात घेत नाहीत. असा आरोप करीत तत्कालीन जि.प.अध्यक्ष व काही पदाधिकार्‍यांनी त्यांचा घेराव केला होता. हे प्रकरण चांगलेच गाजले होते. दरम्यान गेडाम यांनी नऊ पदाधिकार्‍यांविरूध्द गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणाचा सत्र न्यायालय कनिष्ठस्तर येथे आज (ता.७) निर्वाळा देण्यात आला. दरम्यान प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली. निर्दोष सुटका झालेल्यांमध्ये तत्कालीन जि.प.पदाधिकारी तथा विद्यमान आमदार विजय रहांगडाले, आ.विनोद अग्रवाल, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, माजी उपाध्यक्ष मदन पटले, माजी जि.प.सदस्य पंचम बिसेन, विष्णुपंत बिंझाडे, मोरेश्वर कटरे, सौ.संगीता दोनोडे, श्रावण राणा यांचा समावेश आहे.
सन २०१२ मध्ये गोंदिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर गेडाम कार्यरत होते. दरम्यान जिल्हा परिषदेची कार्यप्रणाली विविध प्रकरणावरून चांगलीच गाजत राहायची. तत्कालीन जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, तत्कालीन सभापती मोरेश्वर कटरे, संगीता दोनोडे, श्रावण राणा तसेच तत्कालीन जि.प.सदस्य मदन पटले, पंचम बिसेन, यांच्यासह अनेक पदाधिकार्‍यांचा तत्कालीन सीईओ गेडाम यांच्यावर स्वमर्जीने कामकाज चालवितात. पदाधिकार्‍यांनी सुचविलेल्या कामांकडे दुर्लक्ष केले जाते. असा आरोप करण्यात आला होता. डिसेंबर २०१२ मध्ये पदाधिकार्‍यांनी तत्कालीन सीईओ गेडाम यांच्या कक्षात जावून त्यांचा घेराव केला. दरम्यान धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप गेडाम यांच्याकडून करण्यात आला होता. या प्रकरणाची तक्रार तत्कालीन सीईओ गेडाम यांनी गोंदिया ग्रामीण पोलिसात केली होती. गोंदिया ग्रामीण पोलिसांनी प्रकरण सत्र न्यायालय (कनिष्ठ स्तर ) येथे सादर केले. प्रकरणातील सर्व साक्ष तपासून आज (ता.७) न्या.कु.पुनसे यांनी निर्वाळा दिला. दरम्यान प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली. प्रकरणाच्या निर्वाळ्यानंतर आ.विनोद अग्रवाल, आ.विजय रहांगडालेसह सर्व माजी पदाधिकार्‍यांनी सटकेचा श्वास घेतला. आरोपींची बाजू अ‍ॅड.टि.बी.कटरे, हेमलता पतेह, अ‍ॅड.दिप्ती भगत यांनी मांडली. उल्लेखनिय असे की, या प्रकरणातील फिर्यादी असलेले तत्कालीन सीईओ यशवंत गेडाम यांनी या प्रकरणाला तेवढे गांभीर्याने घेतले नाही. ते अनेक सुनावणीत अनुपस्थित राहिले.