गडचिरोली दि. ११ :– जिल्हयातील शासकीय कार्यालये व त्यांच्या अधिनस्त असणाऱ्या सर्व कार्यालयांना ऑप्टीकल फायबर केबल कनेक्टीवीटीद्वारे इंटरनेट सुविधेची जोडणी देण्यात येणार आहे असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी या कामाच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले. सदर इंटरनेट जोडणी वा वापराचे शुल्क शासनामार्फत दिले जाणार असून महाआयटीने टेलीकॉम सर्विस प्रोव्हाईडर म्हणून शासनाच्या नागरी महानेट प्रकल्पांतर्गत रिलायन्स जीओ इन्फाकॉम लीमीटेड यांना नियुक्त केले आहे. या कामाची सुरूवात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ प्रातिनिधीक स्वरूपात, जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आली.
या शासनाच्या नागरी महानेट प्रकल्पांतर्गत गडचिरोली जिल्हयातील शासकिय कामात गती येणार असून दुर्गम भाग इंटरनेटने जोडला जाणार आहे. या कार्यक्रमातून शासनासाठी वापरलेल्या सुविधेचे देयक शासनाकडून संबंधित पुरवठादारास दिले जाणार आहे. तसेच याचा फायदा सामान्य लोकांनाही घेता येणार आहे. मात्र अशा खाजगी जोडणीचे शुल्क व वापराचे पैसे त्यांनाच द्यावे लागणार आहे. जिल्हयातील बाराही तालुक्यात येत्या सहा महिन्यात या कामाची अंमलबजावणी पुर्ण केली जाणार असल्याचे पुरवरवठादाराने सांगितले.
सदर प्रकल्पाच्या उद्घाटनास जिल्हा माहिती व विज्ञान अधिकारी एस.टेभुर्णे, नायब तहसिलदार दोनाडकर, महाआयटीचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक जयंत मुंकूदवार, वरिष्ठ नेटवर्क अभियंता कमलेश आकरे, राहुल बावणे, भुपेंद्र काबंळे, जिओ तर्फे पकंज सातपुळके, प्रसन्ना देशमुख, जितेंद्र अहिरवार, सचिन पोहारकर, रसीद शेख आदि उपस्थीत होते.





