गोंदिया,दि.12ः जिल्ह्यातील जुन्या रोजगार हमी योजनेमधील २५ सेवा खंडित हजेरी सहायकांनी ११ फेब्रुवारीपासून पदस्थापना व वेतन श्रेणी मंजूर करून पगार देण्यात यावे, या मागणीला घेऊन जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
जिल्ह्यातील २५ सेवा खंडीत हजेरी सहायक १९ डिसेंबर २0१८ पासून पंचायत समिती अंतर्गत कार्यरत आहेत. परंतु, त्यांचा पगार अद्याप झालेला नाही. तसेच पदस्थापना व वेतन श्रेणी मंजूर न केल्यामुळे त्यांच्यावर मोठा अन्याय झाला आहे. शिवाय आजपयर्ंत पगार न झाल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक समस्या कोसळली आहे. ६ टक्के प्रशासकीय निधीमधून किमान वेतन श्रेणी देण्यात यावे तसेच शासनाकडून पगारासंदर्भांत निर्णय येईपयर्ंत त्यांची पयार्यी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी या हजेरी सहायकांनी केली आहे. सदर आंदोलनात एस.डी. देसाई, श्यामराव भांडारकर, राजेंद्र मेर्शाम, दिगंबर कोरे, रवि सोनटक्के, लक्ष्मण बारसे आदी सहभागी झाले आहेत.





