35.6 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ घाटकुरोडयातील शिवविवाहात ओबीसी जनगणनेवर मार्गदर्शन 

घाटकुरोडयातील शिवविवाहात ओबीसी जनगणनेवर मार्गदर्शन 

0
41

गोंदिया,दि.13- जिल्ह्यातील तिरोडा तालुकांतर्गत येत असलेल्या घाटकुरोडा येथे नुकतेच पार पडलेल्या विवाहसोहळ्यात ओबीसी जनगणनेचा रकाना नाही,तर आमचा जनगणनेत सहभाग नाही हे स्टिकर वरवधुसंह पाहुण्यांनी हातात घेत या शिवविवाह सोहळ्याला नवखे रुप प्राप्त करुन दिल्याने तालुक्यात या विवाह सोहळ्याचीच चर्चा सुरु झाली आहे.  विश्वनाथ डोंगरवार यांनी सनातनी परंपरा नाकारून आधुनिक, परिवर्तनवादी विचारांच्या शिवधर्म पद्धतीने आपला विवाह सोहळा पार पाडला.या विवाह सोहळ्याला लाभलेले मुख्य मार्गदर्शक भंडारा जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अनिल भुसारी यांनी ओबीसी जनगणनेचे महत्व विशद केले. वधू वराला आणि वराडी मंडळीना ओबीसी जनगणनाचे स्टिकर देण्यात आले.यावेळी त्यांच्यासोबत प्रतिभा लांडगे तालुकाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड, शितल भुसारी कोषाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड उपस्थित होते.