भंडारा, दि.16- फेब्रुवारी या महिण्याचे महिला लोकशाही दिनाचे आयोजन 17 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 12 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे आयोजित करण्यात आले आहे. या महिला लोकशाही दिनात न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक आस्थापने विषयक बाबी अशी प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत. तरी ज्या महिलांचे वरील बाबी सोडून तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असतील अशा तक्रारी वरील वेळेत स्विकाण्यात येईल. तक्रारीचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, शिवाजी क्रिडा संकूल, बस स्टॉप जवळ, भुविकास बँक भंडारा येथे उपलब्ध आहे. तक्रार अर्ज सादर करतांना अर्जासोबत जिल्हाधिकारी यांना उद्देशुन अर्ज, तालुका महिला लोकशाही दिन टोकन क्र. प्रत, तहसिलदाराच्या उत्तराची प्रत सोबत जोडावी. तरी महिलांनी याबद्दलची नोंद घ्यावी असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.




