धान घोटाळा झालाच नाही : वैरागडे

0
18

भंडारा,दि.16 : मागील वर्षी शासनाद्वारे शेतकर्‍यांना धान खरेदी केंद्रामार्फत २00 रूपये प्रति क्विंटल याप्रमाणे बोनस वाटप करण्यात आले. यात भंडारा, मोहाडी आणि तुमसर या तीन तालुक्यात शासनाने सुरु केलेल्या २२ धान खरेदी केंद्रांवर १00 कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर नागपूरचे विभागीय आयुक्तांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती गठित केली होती.या समितीने आयुक्तांना दिलेल्या अहवालात धान खरेदीतील अनियमितेवर ठपका ठेवला होता.त्यात जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍यांसह धान खरेदी केंद्र संचालकांना दोषी ठरविण्यात आले. त्यानंतर या प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरू झाली आहे.दरम्यान ज्या धान खरेदी केंद्रावर घोटाळा झाला आहे, त्यांच्याकडून आरोप फेटाळून लावण्यात येत असले तरी ज्यांनी चौकशीचा ससेमिरा लावला आहे, त्यांच्याकडून घोटाळा करणारे आता जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप होत आहे.
यासंदर्भात डोंगरगाव शेतकरी सहकारी धान गिरणीचे अध्यक्ष अँड. जयंत वैरागडे हे आयोजित पत्रपरिषदेत म्हणाले, २0१३-१४ या वर्षात मार्केटिंग फेडरेशनने धान खरेदी करण्याचे आदेश दिले होते. या संस्थेने मागील २0 वर्षात धान भरडाईचे कंत्राट घेतले नाही. त्यामुळे संस्थेनी पैशाची उचल केली नाही. २0१३-१४ या वर्षात या संस्थेने ‘अ’ ग्रेडचे १४,११२.२0 क्विंटल धान खरेदी करुन १३,८५३.0२ क्विंटल भरडाईसाठी दिले. २५९.१८ क्विंटल धानाची घट झाली. साधारण धानाची १५,२९२.८0 क्विंटल खरेदी करण्यात आली. १४९२६.७६ क्विंटल धान भरडाईसाठी देण्यात आले. ३६८.0४ क्विंटलची तुट झाली. नियमापेक्षा जास्त तुटीची रक्कम ही संस्थेला मिळणार्‍या कमिशनमधून मार्केटिंग फेडरेशन कपात करीत असते. जिल्ह्यातील एकूण खरेदीपैकी ३.९७ टक्के खरेदी डोंगरगाव संस्थेची आहे.
यावेळी ते म्हणाले, २0१३-१४ या वर्षात धान खरेदीसंदर्भात विभागीय आयुक्तांनी महेश आव्हाड यांचे अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय चौकशी तयार केली. चौकशीच्या वेळी संस्था सचिवांना मार्केटिंग फेडरेशनमार्फत चौकशी अहवाल तयार करण्यात आला. डोंगरगाव संस्थेने नियमापेक्षा जास्त रक्कम भरली असल्याचा शेरा दिला आहे. त्यामुळे धान खरेदी केंद्रावर धान न देता धान खरेदी दाखविली आहे, या मुद्दात तथ्य नसल्याचे मत नोंदविले आहे.
संस्थेमध्ये सातबारा उतार्‍याची शहानिशा करुन व तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून टोकन घेऊन धान खरेदी करण्याचे काम व्यवस्थापक व ग्रेडर यांची असते. धान खरेदी करुन शेतकर्‍यांचे पैसे धनादेशाद्वारे देण्याचे काम व्यवस्थापकांची असते. डोंगरगाव संस्थेने धानाचे पैसे व्यवस्थापक नामदेव समरीत व संचालक प्रकाश कुंभलकर यांच्या संयुक्त सहीने केले आहे.
भंडारा जिल्हयात २0१३-१४ यावर्षी महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनतर्फे १0९,७0,९९,८0६.७५ (१0९ कोटीचे) धान खरेदी करण्यात आले. त्या धानाची संपूर्ण भरडाईकरुन सदर रकमेचा तांदूळ एफसीआयला जमा करण्यात आला. त्यामुळे १00 कोटीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप तथ्यहीन असल्याचे वैरागडे यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण धान खरेदी प्रकरणात आपला कोणताही संबंध नसताना अर्बन बँकेच्या निवडणुका लक्षात घेऊन आपल्याला जाणीवपूर्वक गोवण्यात येत असल्याचा आरोपही वैरागडे यांनी केला. पत्रपरिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय दलाल, अर्बन बँकेचे संचालक रामदास शहारे, पप्पु गिर्‍हेपुंजे, धनंजय ढगे, डॉ.श्रीकांत वैरागडे, अँड.निनाद बेदरकर उपस्थित होते.