29.4 C
Gondiā
Friday, June 19, 2026
Home विदर्भ विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंना आदिवासी गोवारी जमातीचे शिष्टमंडळ भेटले

विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंना आदिवासी गोवारी जमातीचे शिष्टमंडळ भेटले

0
36

अर्जुनी मोरगाव,दि.22ः-प्रतापगड महादेव पहाडी येथे महाशिवरात्री यात्रे निमित्त अर्जुनी मोर तालुक्याच्या दौऱ्यावर असलेेले महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची(दि.21)आदिवासी गोवारी जमातीच्या शिष्टमंडळाने भेट घेत गोवारी जमातीच्या प्रलंबित मागण्याबाबद सविस्तर चर्चा केली.त्यावर लवकरच गोवारी जमातीच्या प्रलंबित मांगण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन पटोले यांनी शिष्टमंडळाला दिले.मागिल दोन महिण्यापासुन गोवारी प्रश्नाविषयी सकारात्मक परिस्थिती निर्माण होण्याबाबाद उच्च स्तरिय बैठका आयोजित केल्या आहेत असेही पटोले यांनी यावेळी सिंगितले.
शिष्टमंडळात आदिवासी गोवारी संघर्ष कृती समिती गोंडवानाचे संयोजक दामोदर नेवारे, जिल्हा दुग्ध संघाचे माजी संचालक तथा समाज संघटनेचे अर्जुनी मोर तालुका अध्यक्ष भिवाजी राऊत, साकोली पं.स.चे माजी सभापती शंकर राऊत , जेष्ठ कार्यकर्ते मुकुंदा सेंदरे सिरोली ,लक्ष्मण शाहारे ,तसेच यावेळी भंडारा जिल्हा मध्य.सह.बॅकेचे उपाध्यक्ष सदाशिवराव वलथरे , भंडारा जिल्हा आदिवासी जंगल कामगार संघाचे अध्यक्ष विश्वनाथ घरत , बाम्हणी आदिवासी जंगल कामगार संस्थेचे अध्यक्ष केशव घरत प्रामुख्याने उपस्थित होते.