गोंदिया,दि.23ः सोमवारपासून २४ फेब्रुवारी पासून पुन्हा इतवारी-गोंदिया-बालाघाट लोकल रेल्वेगाडी सुरु करण्यात येत आहे. २0 फेब्रुवारी रोजी यासंदर्भात एक आदेश काढण्यात आले आहे. त्याचप्रकारे दपूम रेल्वेकडून अधिकार्यांना निर्देश देण्यात आले आहे.
गोंदिया-इतवारी या रेल्वेगाडीला बालाघाटपयर्ंत विस्तारीत करुन बालाघाट-गोंदिया-इतवारी अशी चालविण्यात येत होती. मात्र इतवारी-बालाघाट मार्गावर गाड्या उशीरा धावत असल्याने याचा प्रभाव या गाडीवर झाला होता. या गाडीचा गोंदिया पोहचयाची वेळ दुपारी ४:२0 वाजताची होती. परंतु ही गाडी पहाटे ५:३0 ते ६ वाजतादरम्यान येते. विवाह समारंभाच्या निमीत्त सायंकाळी ७ वाजता बालाघाट वरुन गोंदिया येथे पोहचत असल्याने प्रवाशांना त्रास देण्याचे काम केले. बालाघाटच्या प्रवाशांनाही हा प्रवास त्रासदायक ठरत होता. रेल्वेगाडीच्या नादात ज्या ५ गाड्या गोंदिया-बालाघाट दरम्यान धावत होत्या, त्यांच्यावरही प्रभाव पडला. गोदिया स्थानकावर ही गाडी पूर्णपणे प्रवाशांनी भरते. परंतु बालाघाट वरुन आल्यानंतर या गाडीत बसायला गोंदियातील प्रवाशांना जागा राहत नाही. त्यावेळी प्रवाशांना गोंदियात वेगळ्या गाडीची मागणी करण्यात आली होती. परंतू या दिशेने पाऊल उचलण्यात आले नाही. परिणामी रेल्वे प्रशासनाने इतवारी-गोंदिया-बालाघाट दरम्यान धावणार्या गाडीला काही महिन्यांतच बंद केले होते. त्याऐवजी पुन्हा इतवारी-गोंदिया दरम्यान गाडी सुरु करण्यात आली होती.
इतवारी ते गोंदियासाठी धावणारी रेल्वेगाडी दुपारी २ ते २.३0 वाजता दरम्यान फलाट क्र. ७ वर पोहचते. तर दुपारी ३.१0 वाजता गोंदियावरुन सुटून सायंकाळी इतवारी येथे पोहचणारी लोकल रेल्वेगाडी आता पुन्हा इतवारी ते बालाघाट व बालाघाट ते इतवारी दरम्यान धावणार आहे. गाडी क्र.६८७१४-६८७१५ ला मेमू बनवून २४ फेब्रुवारीपासून इतवारी-बालाघाट-इतवारी दरम्यान चालविले जाणार आहे.





