33.8 C
Gondiā
Thursday, June 18, 2026
Home विदर्भ अर्जुनी-मोर बसस्थानकात मातृभाषा मराठी गौरव दिन साजरा

अर्जुनी-मोर बसस्थानकात मातृभाषा मराठी गौरव दिन साजरा

0
86

अर्जुनी-मोर,दि.27ः-अर्जुनी-मोर येथील बसस्थानकात मातृभाषा मराठी गौरव दिन आज 27 फेब्रुवारीला साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला पत्रकार संतोष बुकावन, पत्रकार संतोष रोकडे, राज्य परिवहन आगार साकोली के सहाय्यक वाहतूक निरीक्षक विकास सपाटे, वाहतूक नियंत्रक आगार साकोलीचे वाहतूक नियंत्रक रामेश्वर मोटघरे, चालक संतोष सलामे, वाहक नरेश मेनवाडे, निवृत्त वाहतूक नियंत्रक जगदीश गंथडे, ब्रिक्स कंपनीचे स्वच्छक रामदास पुस्तोडे, कैलास मस्के व इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला वि,वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले तसेच याप्रसंगी उपस्थित प्रवाशांना मान्यवरांनी पेढे वाटून मराठी गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थित मान्यवरांनी मराठी भाषेचे महत्व समजावून सांगितले.