शास्त्रीवार्ड गोंदिया येथे जागतिक महिलादिनी समाजप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन

0
135

गोंदिया,दि.03ःस्थानिय पोवार समाज संघटन शास्त्रीवार्ड गोंदिया अतंर्गत महिला समीतीच्या वतिने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत 8 मार्च,रविवारला सकाळी 11 वाजता यशोदासभागृह येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमीत्त समाजप्रबोधनपर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.यावेळी कार्यक्रमा दरम्यान शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक क्षेत्रात प्रगत महिलांचा सत्कार,व्यक्तिमत्व विकासात्मक मार्गदर्शन,सांस्कृतिक विकासात्मक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.महिला दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्या सीताबाई रंहागडाले राहणार आहेत.
उदघाटन अॅडव्होकेट कु.भगवती तुरकर यांच्या हस्ते होणार आहे.विशेष पाहूणे म्हणून एक्वायर पब्लिक एज्युकेशन सोसायटी गोंदियाच्या कोषाध्यक्ष सौ.मिनाक्षी कटरे,मार्गदर्शक म्हणून सालेकसा तालुका महिला दक्षता समीतीच्या अध्यक्ष विमल कटरे,दिव्या भगत पारधी उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाला पोवार समाजाच्या महिला भगिनींना बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पोवार समाज महिला समीती शास्त्रीवार्ड गोंदियाच्या अध्यक्षा संगिता रंहागडाले,संयोजिका गिता चौधरी,सचिव आशा रंहागडाले, माधुरी कटरे,भुमिका राणे,अंजु चौधरी,शितल बिसेन,रेखा पारधी,कविता ठाकरे,सुनिता रहागंडाले,गायत्री कटरे,भुमेश्वरी बिसेन,निता तुरकर,रिता कटरे,पुष्पा अंबुले,ओमलता कटरे,भुमेश्वरी पारधी,कविता रहागंडाले,रिता चौधरी,माधवी गौतम व शांता पारधी यांनी केले आहे.
यांनी केले आहे.