किरसान मिशन शाळेत विज्ञान प्रदर्शनाला प्रतिसाद

0
104

गोरेगाव,दि.03ः-स्थानिक किरसान मिशन स्कूल व जुनिअर कॉलेज गोरेगाव येथे थोर वैज्ञानिक डॉ. सी. व्ही. रमण यांच्या स्मुर्ती मध्ये विज्ञान प्रदर्शनी आयोजित करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे उद््घाटन प्राच डॉ. संजीव रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ.विनोद गेडाम सहाय्यक प्राध्यापक, प्राचार्य डॉ. विनोद उके उपस्थित होते.
यावेळी शाळेतील शिक्षक शिक्षिका लक्ष्मी चौरसिया, पुष्पलता सोनवाणे, माधुरी गोदुले, गोदावरी डोहळे, ज्ञानेश्‍वरी पटले, पी.डी.रहांगडाले, सुनील रहांगडाले, मीरा साठवणे, सरिता चिपे, माधुरी बघेले, मंगला जांभुळकर, ममता चौधरी, छाया हरिणखेडे, गीता जागणित प्रमोद रहांगडाले, केशव मेर्शाम, कुणाल बोरकर, काजल बोरकर, गणेश चौधरी, खिलेश सोनवणे, हर्षा ठाकरे, माईकल सिहारे, आर. आर. कटरे, सचिन रामटेके, धर्मेंद्र राऊत, डॉ.विनोद उके आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ.रहांगडाले यांनी विज्ञान विषयामुळे विदयार्थ्यांमध्ये शोधप्रवृती, चौकशवृत्ती, व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो, असे व्यक्त केले. तर भारतामध्ये अंधर्शद्धा, बुवाबाजी व चमत्कार जास्त प्रमाणात दिसत आहे, यांचे कारण वैज्ञानिक ज्ञानावर लोकांचा विश्‍वास असूनही फक्त विज्ञान नौकरी, आर्थिक संपादन व पदव्या मिळवण्यासाठी होत आहे, असे डॉ.विनोद गेडाम यांनी सांगितले. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग सादर केले. उपस्थित अतिथींनी प्रयोगाचे निरीक्षण करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी मोठय़ा संख्येत विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनीत सहभाग घेतला होता.