जलयुक्त शिवार अभियानाबाबत जनजागृती : तालुक्यातील गावांमध्ये फिरणार वाहन

0
6

चामोर्शी दि.२९–: जलयुक्त शिवार अभियानांतर्गत चामोर्शी तालुक्यातील जलदिंडी काढण्यात येणार असून या उपक्रमाची सुरूवात चामोर्शी येथे बुधवारी करण्यात आली.पंचायत समिती सभापती शशिकला चिळंगे व तळोधी ग्राम पंचायतीच्या सरपंच माधुरी सुरजागडे यांच्या हस्ते जलदिंडीच्या वाहनाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी तालुका कृषी अधिकारी व्ही. ए. रजपूत, मंडळ कृषी अधिकारी ए. बी. उभे, कृषी पर्यवेक्षक ए. आर. चव्हाण, ए. एच. पिल्लारे, कृषी सहाय्यक भांडेकर उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी रजपूत यांनी जलदिंडी कार्यक्रमाचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून सांगितले. दिवसेंदिवस जलपातळी कमी होत चालली आहे. त्यामुळे भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकाने पाण्याचा प्रत्येक थेंब वाचलविला पाहिजे, असे मार्गदर्शन केले.सदर वाहन चामोर्शी तालुक्यातील तळोधी, कुरूड, भाडभिडी, थाटरी, जामगिरी, वसंतपूर, घोट या गावांमध्ये फिरून जलयुक्त शिवार अभियानाबाबत ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करणार आहे.