33 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home विदर्भ अशोक विद्यालय मारडा येथे आर.एस.वाळके यांचा निरोप समारंभ

अशोक विद्यालय मारडा येथे आर.एस.वाळके यांचा निरोप समारंभ

0
107

अंजनसिंगी,दि.08 :-अशोक शिक्षण संस्था अशोकनगर द्वारा संचालितअशोक विद्यालय मारडा येथील सहकारी शिक्षक आर.एस.वाळके यांच्या सेवानिवृत्ती निमित्त शाल व श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला .
यावेळी वाळके यांनी शाळेबद्दल असणारा जिव्हाळा अनेक उदाहरणे देऊन विशद केले. विद्यार्थ्याना मोबाईल अतिवापराचे दुष्परिणाम सांगून मोबाईलच्या आहारी जाऊ नये व वाचनाची आवड निर्माण करावी असे मार्गदर्शन केले. तसेच जीरापुरे यांनी वाळके यांच्याकडून बरेच काही शिकल्याचे सांगितले.कुरजेकार यांनी सेवानिवृत्त निमित्त ‘निवृत्ती छ ! जगण्याची नवी आवृत्ती !!ही सेवानिवृत्ती कविता सादर केली. तसेच मोहनबाबू हिरोडे व राजाभाऊ खैरकार यांनीही विचार व्यक्त केले.शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्रीमती कुमरे यांच्या भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.