38.4 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home विदर्भ तहसिल कार्यालयात महिलादिनी मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

तहसिल कार्यालयात महिलादिनी मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

0
170

गोंदिया,दि.08ःजागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात परिविक्षाधीन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.महिलादिनानिमित्त महिला कर्मचारी अधिकारी व मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यात सहभाग घेत महिलासंह मुलांनी आपल्या कलेचे छाप सोडली.कार्यक्रमाला नायब तहसिलदार गणपत शिंगाडे,सचिन पाटील निरिक्षण अधिकारी भारती वाकोडे तसेच तहसील कार्यालय आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी कुटुंबासह उपस्थित होते. सदर कार्यक्रमादरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर,राजमाता जिजाऊ,सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्रास पुष्पमाला अर्पण करुन दीपप्रज्वलन करण्यात आले.सर्व मुलांना वाचन साहित्य पुरस्कार स्वरूप वाटप करण्यात आले.तसेच अधिकारी-कर्मचारी यांना भारतीय संविधानाचे वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमानंतर सर्वांनी एकत्रित स्नेह भोज करून उपस्थित सर्वांचे आभार मानण्यात आले.