30.2 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home विदर्भ छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जनामनात रुजवा – चौरागडे

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जनामनात रुजवा – चौरागडे

0
164
गोंदिया,दि.13ःछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (तिथीनुसार) शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोंदियाच्या वतीने कार्यक्रम साजरा करण्यात आला. जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जनामनात रुजवून एक उत्कृष्ट समाज निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सैनिकांनी सदैव तत्पर असावे. तसेच ज्या पद्धतीने महाराजांनी परस्त्रीला मातेसमान वागणूक दिली तसेच समाजात वावरताना परस्त्रीला मातेसमान दर्जा देऊन त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपली आहे, असे मार्गदर्शन यावेळी जिल्हाध्यक्ष मनिष चौरागडे यांनी केले. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून जिल्हा उपाध्यक्ष मिलन रामटेककर, गोंदिया तालुकाध्यक्ष सुरेश ठाकरे, सालेकसा तालुकाध्यक्ष ब्रजभूषण बैस, शहराध्यक्ष राजेश नागोसे, शहर उपाध्यक्ष क्षितिज वैद्य मनसे,  रजत बागडे, सालेकसा शहर अध्यक्ष राहुल हटवार व शुभम नागोसे, निरव वानखेडे, आर्चिस बोरकर, अभिषेक रामटेके, व गोंदिया शहरातील पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन क्षितिज वैद्य यांनी केले.