एस.टी. ३३.६४ कोटींनी तोट्यात

0
5

भंडारा,दि.३१: प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या भंडारा विभागात येणाऱ्या सहा आगारातून १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या वर्षात ११२.३९ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले. यात कर्मचाऱ्यांचे वेतन, बसेसची देखभाल, अवैध वाहतूक, डिझेल, टोलटॅक्स आदीवरील खर्च वगळता विभागाला ३३ कोटी ६४ लाख रूपयांचा तोटा झाला आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत उत्पन्नामध्ये १० कोटी ५३ लाख रूपयांमध्ये वाढ झाली असली तरी विभाग तोट्यात आहे.राज्यातील प्रवाशांचा भार वाहणाऱ्या एसटीची संपूर्ण राज्यात आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. यापासून भंडारा विभागदेखील सुटले नाही. भंडारा विभागात भंडारा व गोंदिया या दोन जिल्ह्याचा समावेश आहे. यात भंडारा, गोंदिया, साकोली, तुमसर, पवनी, तिरोडा असे मिळून भंडारा विभागात एकूण सहा आगार आहेत. या आगाराअंतर्गत ९ सेमी लक्झरी, ३९ मिडी असे मिळून एकूण ४१९ बसेस आहेत.
बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात पार्किंग न करण्याचा नियम आहे. मात्र अवैध वाहतूकदार या नियमांचे उल्लंघन करीत आहेत. पोलीस व आरटीओ विभागाकडून कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र त्यांच्याकडून प्रयत्न होत नसल्यामुळे महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे.