साकोली – देव्हाडा मार्ग देतोय अपघाताला निमंत्रण

*➡️रस्त्याच्या रुंदिकरणाची मांगणी*

0
97

एकोडी ( संजय समरित )दि.१६ :साकोली – देव्हाडा प्रमुख राज्यमार्ग असुन रस्ता अरुंद असल्याने या रस्त्यावर दररोज अपघात होत असुन अपघात मृत्यू व जखमी होण्याच प्रमाण खुप जास्त आहे .या रस्त्याच्या निर्मातिला ५० वर्ष पुर्ण झालित . केवळ ३ मिटर रूंदीचा डांबर रोड आहे . या रस्त्यावरुन आंतरराज्य वाहतुक होत असुन मध्येप्रदेश – महाराष्ट्र –  छतीसगढ  या राज्यातील वाहतूक होते . नागझिरा , न्यु नागझिरा , व कोका अभ्याअरण्य याच मार्गावर आहेत . खनिज साहित्यची वाहतूक मोठ्याप्रमाणावर याच मार्गाने होत असते . दररोज हजारो वाहन या मार्गावरून आवागमन करतात . परंतु या मार्गाचे रुंदीकरण शासनाने न करता लाखणी – सालेभाटा – बांपेवाडा उमरझरी या कमी वाहतुकिच्या मार्गाचे राष्ट्रीयमहामार्ग सारखे रुंदीकरण करुन मजबूत बांधकाम केल आहे .केंद्रीय रस्ता बांधकाम मंत्री नितिन गडकरी यांच्या मानस ॲग्रो कंपनी चा साखर कारखाना याच मार्गावर असल्यामुळे डब्बल ट्रेलर लावून ऊसाची एका ट्रकटर मध्ये २० टन वाहतूक केली जाते त्यामुळे रस्ता जागोजागी उखडला आहे . रस्ता अरुंद व डबल ट्रेलर वाहतूक यामुळे दुचाकी स्वाराना जिवमुठित घेवून प्रवास करावा लागत आहे व अपघात जास्त प्रमाणात होत आहेत . ३ मिटर चा रोड हा ५० वर्षापासून आहे . त्याकाळात वाहण्य नगण्य होती प्रवास सायकल ने केल्याजात होता परंतु आज घरोघरी मोटार सायकल झाल्या आहेत रस्ता तोच वाहणे हजारो त्यामुळे अपघातच प्रमाण जास्त झाल आहे . रोडच्या कडा सुद्धा खुप खोल आहेत काहि काहि ठिकाणी १ फुटाच डांबर रोड व मोकळी जागेत अंतर आहे . रोडच्या बाजुला गेली अनेक वर्ष झुडपांची कटाई न झाल्यामुळे रोडवरती झुडप आली आहेत . या कडे लोकप्रतिनिधीच व सार्वजनिक बांधकाम विभागाच दुर्लक्ष असून अपघाताला जबाबदार सार्वजनिक आरोग्य विभाग व या क्षेत्रातिल लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत . या रस्त्याचे तात्काळ रुंदीकरण व मजबुतिकरन करण्याची मांगणी या परिसरातील जनतेची आहे .