गोंदिया: येथील हिरवळ बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही वृक्षारोपण करण्यात आले. अदानी फाऊंडेशनच्यावतीने या वृक्षारोपणासाठी रोपे पुरविण्यात आली. तसेच राष्ट्ररक्षा समितीच्यावतीने ही तलाव परिसरात, खरोबा मंदिर परिसर, गोंदिया शहरातील संताजी नगर शिवनगर, गजानन कॉलनी आदि भागात वृक्षारोपण करण्यात आले. यात जिवनोपयोगी झाडांंचा समावेश आहे. हिरवळ संस्थेमार्फत बांबूचे ट्री-गार्ड लावण्यात आले. वृक्षारोपणासाठी हिरवळ संस्थेचे छत्रपाल शहारे, रुपेश qनबार्ते, प्रफुल जरोदे, छत्रपाल चौधरी, जिगनेश जोशी यांनी सहकार्य केले.