३४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यु

६८ रुग्ण औषधोपचारातून बरे : नव्या ५४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर एक हजाराच्या वर ॲक्टीव्ह रुग्ण ११५ कंटेंटमेन्ट झोन

0
1883

गोंदिया,दि.०७  : जगभर हातपाय पसरविलेल्या कोरोना विषाणू संसर्गाचा विळखा जिल्ह्यात देखील घट्ट होत असल्याचे दररोज आढळून येणाऱ्या रुग्ण संख्येवरुन लक्षात येत आहे. आज ७ सप्टेंबर रोजी प्राप्त अहवालात दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ५४ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ६८ रुग्ण औषधोपचारातून बरे झाले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ३ रुग्ण हे बाहेर जिल्हा किंवा राज्यातील आहे. गोंदिया मेडिकल कॉलेज येथे ४५ वर्षीय रुग्ण राहणार धतोरा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर १०८ वर्षीय रुग्ण राहणार सिव्हील लाईन गोंदिया यांनी खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केली असता त्यांचा अहवाल सकारात्मक आला व त्यांचा घरी मृत्यू झाला.

जिल्हयात कोरोना विषाणू संसर्ग झाल्याची शक्यता आहे किंवा बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी विषाणू प्रयोगशाळेतून किंवा रॅपिड अँटिजेन चाचणीतून करण्यात येते. जिल्ह्यात आतापर्यंत प्रयोगशाळा चाचणीतून १६७५ नमुने आणि रॅपिड अँटिजेन चाचणीतून ७९३ नमुने असे एकूण २४६८ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले.

आज जे ५४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये जिल्हा/राज्याबाहेर असलेले एक रुग्ण आहे. गोंदिया तालुक्यात ३६ रुग्ण आज आढळले आहे. यामध्ये बिरसोला-१, चंद्रशेखर वार्ड-१, सिव्हील लाईन-३, दुर्गा चौक-१, फुलचूर-३, गणेशनगर-२, गोंदिया-१, जी.एम.सी. -२, गड्डाटोली-२, हनुमान नगर-१, खमारी-१, नेहरु वार्ड-५, रेलटोली-४, रिंग रोड-१, शास्त्री वार्ड-४, श्रीनगर-३, विवेकानंद कॉलनी-१ रुग्ण.

तिरोडा तालुक्यात चार रुग्ण आढळले असून यामध्ये मुंडीकोटा-१, सुकडी-१, तिलक वार्ड-२ रुग्ण. गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा-१, रापेवाडा-१, मोहगाव-१ रुग्ण. आमगाव येथील एक रुग्ण. सालेकसा येथील एक रुग्ण. देवरी तालुक्यातील पुराडा-१ व देवरी येथील ३ रुग्ण. सडक-अर्जुनी तालुक्यातील सौंदड-१, उशिखेडा-१, सडक/अर्जुनी-१ रुग्ण. अर्जुनी/मोरगाव येथील एक रुग्ण. मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात पॉझिटिव्ह आढळलेले आतापर्यंतचे रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-१३१२ तिरोडा तालुका-३५८, गोरेगाव तालुका- ७९, आमगाव तालुका-१८६, सालेकसा तालुका- ७४, देवरी तालुका-१०६, सडक/अर्जुनी तालुका-८२, अर्जुनी/मोरगाव तालुका-१२२ आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले-४२ रुग्ण आहे.असे एकूण २३६१ रुग्ण बाधित आढळले आहे.

आज जिल्ह्यातील ६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.यामध्ये गोंदिया तालुका-५०, आमगाव तालुका-१, तिरोडा तालुका-१४, गोरेगाव तालुका-२, देवरी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्हयात आतापर्यंत १२४५ रुग्णांनी मात केली आहे. यामध्ये गोंदिया तालुका-६२०, तिरोडा तालुका-२७७, गोरेगाव तालुका-३५, आमगाव तालुका-७३, सालेकसा तालुका-४१, देवरी तालुका-४८, सडक/अर्जुनी तालुका-६४, अर्जुनी/मोरगाव तालुका-८० आणि इतर -७ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात कोरोना क्रियाशील रुग्ण संख्या एक हजाराच्या वर गेली असून ती आता १०८२ झाली आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका-६७४, तिरोडा तालुका-७४, गोरेगाव तालुका-४३, आमगाव तालुका-१०९, सालेकसा तालुका-३२, देवरी तालुका-५९, सडक/अर्जुनी तालुका-१७, अर्जुनी/मोरगाव तालुका-४२ आणि इतर-३२ असे एकूण १०८२ रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत. त्यापैकी १०६६ क्रियाशील रुग्ण जिल्ह्यात व १६ रुग्ण नागपूर येथे उपचार घेत आहेत.

कोरोना क्रियाशील रुग्णांपैकी ४३१ रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे गोंदिया तालुका-३८६, तिरोडा तालुका-१०, गोरेगाव तालुका-00, आमगाव तालुका-१७, सालेकसा तालुका-३, देवरी तालुका-२, सडक/अर्जुनी तालुका-३, अर्जुनी/मोरगाव तालुका-१० व इतर 00 असे एकूण ४३१ क्रियाशील रुग्ण घरीच अलगिकरणात आहे.

जिल्हयात आतापर्यंत ३४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया तालुका-१७, तिरोडा तालुका-७, गोरेगाव तालुका-१, आमगांव तालुका-४, सालेकसा तालुका-१, सडक/अर्जुनी तालुका-१ व इतर ठिकाणच्या तीन रुग्णाचा समावेश आहे.

विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण १९५३० नमुने पाठविण्यात आले. यामध्ये १६९५० नमुने निगेटिव्ह आले. तर १६७५ नमुने पॉझिटिव्ह आले आहे. १७७ नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित असून ७२८ नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे. विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात ३६ व्यक्ती आणि गृह विलगिकरणात ४८४ व्यक्ती अशा एकूण ५२० व्यक्ती विलगिकरणात आहेत. कोरोना बाधितांचा त्वरित शोध रॅपिड अँटीजेन टेस्टमधून घेण्यात येत आहे. या चाचणीतून आतापर्यंत १४८१७ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये १४०२४ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. ७९३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी १६० चमू आणि ११४ सुपरवायझर ११५ कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे. यामध्ये गोंदिया तालुका-७, आमगाव तालुका-२१, सालेकसा तालुका-१३, देवरी तालुका-२०, सडक/अर्जुनी-१२, गोरेगाव तालुका-११, तिरोडा तालुका-२८ आणि अर्जुनी/मोरगाव तालुका-३ असे एकूण ११५ कंटेंटमेंट झोन जिल्ह्यात आहे.