40.1 C
Gondiā
Friday, May 16, 2025
Home Blog Page 14

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर करा :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

0

जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे केली निवेदनातून मागणी……

गोंदिया,दि.०६ःजिल्हयातील धान, मक्का, भाजीपाला, फळबागे तसेच गाव खेडयामध्ये मोठया प्रमाणावर मातीचे घरे व गुरांचे गोठयांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन सरसकट तातडीने आर्थिक मदत करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फेत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना पाठविण्यात आले. खासदार प्रफुल पटेल यांच्या सूचनेनुसार माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नेतृत्त्वात हे निवेदन देण्यात आले.

काही दिवसांपासून गोंदिया जिल्हयात होत आललेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटी मुळे ग्रामीण व शहरी भागातील मोठ्या प्रमाणात घरे व गुरांची गोठे क्षतिग्रस्त होऊन नुकसान झाले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. जिल्हयात धानाचे पिक मोठया प्रमाणावर असुन धान पिकाची नुकसान झालेली आहे. तसेच जिल्हयातील अनेक शेतकरी नगदी पिके म्हणून भाजीपाल्याची लागवड सुध्दा केलेली आहे. परंतु काही दिवासापासून सातत्याने अवकाळी पाऊस होत असल्याने धान, भाजीपाला व अन्य नगदी पिकांचे अतोनात नुकसान झालेले असुन शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. त्यामुळे झालेल्या सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात यावी याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी, गोंदिया यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री महाराष्ट्र शासन, मुंबई यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना प्रामुख्याने माजी आमदार राजेन्द्र जैन, सरपंच बाळकृष्ण पटले, माजी जिल्हा परिषद सदस्य कुंदन कटारे, उपाध्यक्ष जिल्हा परिषद सुरेश हर्षे, माजी समाज कल्याण सभापति पूजा अखिलेश सेठ, जिल्हा परिषद सदस्य जगदीश (बालु ) बावनथडे, जिल्हा परिषद सदस्या अश्विनी रविकुमार पटले, उपसभापति पंचायत समिति शिवलाल जमरे,शहर अध्यक्ष नानू मुदलियार, माजी पंचायत समिति सदस्य अखिलेश सेठ, माजी उपसभापति पंचायत समिति नीरज उपवंशी, कीर्ती पटले, सरला चिखलोंडे, माजी सरपंच रविकुमार (बंटी) पटले, पंचायत समिति सदस्य शंकरलाल टेम्भरे, माजी सरपंच नितीन टेम्भरे, पंकज चौधरी, सुनील पटले, लीकेश चिखलोंडे, शिवलाल नेवारे, चुन्नीलाल शहारे, राकेश वर्मा, रौनक ठाकूर, ग्राम पंचायत सदस्य संजय चौरे आदी कार्यकर्ता उपस्थित होते.

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनने आयोजित भव्य रक्तदान शिबिरात २०७ युनिट रक्तदान

0

*आमदार श्री विनोद अग्रवाल यांनी शिबिराचे उद्घाटन केले*

गोंदिया, ५ मे २०२५: मानवी एकता दिनाच्या शुभ प्रसंगी, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन (मुख्यालय दिल्ली) च्या गोंदिया शाखेने रविवार, ४ मे २०२५ रोजी सतगुरु माता सुदीक्षा जी महाराजांच्या अपार कृपेने आणि मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले. हे शिबिर संत निरंकारी सत्संग भवन, गोंदिया, स्थानिक श्रीनगर येथे सकाळी 10:00 ते सायंकाळी 6:00 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
या पवित्र शिबिराचे उद्घाटन गोंदियाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री विनोद अग्रवाल यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली.
प्रमुख उपस्थित होते:महात्मा किशन तोलानी (शिबिर समन्वयक) दर्यानोमल आसवानी (पूज्य सिंधी पंचायत अध्यक्ष),गोंदिया मेडिकल डिन कुसुमाकर घोरपड़े, नेत्र मित्र नरेश लालवानी,डॉ. सनी जयस्वाल,डॉ. पूनम जयस्वाल आणि सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील इतर प्रतिष्ठित व्यक्ती
शिबिरात एकूण २२६ महात्मांनी रक्तदानासाठी नोंदणी केली, त्यापैकी २०७ रक्तदात्यांनी यशस्वीरित्या रक्तदान केले. १९ महात्मांना आरोग्याच्या कारणांमुळे, विशेषतः कमी हिमोग्लोबिनमुळे नाकारण्यात आले.
शिबिरात रक्त संकलनाची जबाबदारी बीजीडब्ल्यू रक्तपेढीने घेतली आणि सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
व्यासपीठावरील वक्त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की, “रक्तदान हे सर्वात मोठे दान आहे. ते मानवी जीवन वाचवण्याचे एक साधन आहे आणि समाजाप्रती असलेल्या आपल्या सेवाभावाचा पुरावा आहे.”
संत निरंकारी मिशनच्या सेवाभावी परंपरेचे कौतुक करताना ते म्हणाले की, अशा कार्यक्रमांमुळे सामाजिक सौहार्द, मानवता आणि बंधुता मजबूत होते.
हे रक्तदान शिबिर केवळ सामाजिक जबाबदारीचे पालन नव्हते तर सद्गुरुंच्या आशीर्वादाने प्रेरित होऊन मानवतेच्या पवित्र सेवेचे एक उदाहरण बनले. शेवटी, आयोजकांनी सर्व रक्तदाते, पाहुणे, सहाय्यक संस्था आणि सेवाभावी स्वयंसेवकांचे मनापासून आभार मानले.

चार आठवड्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा”, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

0

नवी दिल्ली–गेल्या अडीच-तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चार आठवड्यात निर्णय घ्या, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला दिले. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन. के. सिंग यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. लाईव्ह लॉने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

ओबीसी आरक्षणाचं काय होणार?
आयोगाच्या २०२२ च्या अहवालापूर्वी महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार ओबीसी समाजाला आरक्षण देऊन या निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच, येत्या चार महिन्यांत पार पडली पाहिजे. योग्य परिस्थितीत कालावधी वाढवून दिला जाऊ शकतो, असंही सर्वोच्च न्यायालयाने पुढे स्पष्ट केलं.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे मुंबईसह राज्यसभरातील महापालिकांच्या निवडणुका लवकरच लागण्याची शक्यता आहे. गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून या निवडणुका रखडल्या आहेत. महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या किती असावी, प्रभाग रचना कशी असावी आणि प्रभाग रचना, सदस्यांची संख्या राज्य निवडणूक आयोगाने ठरवावी की राज्य सरकारने आणि ओबीसी आरक्षणासहित निवडणुका व्हाव्यात की नाही आदी विविध विषयांवर सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित होती.

अर्जुनी चांदोरी खुर्द व बोंडराणी सिमेंट रस्ताचे भूमिपूजन परसवाडा

0

चित्रा कापसे
तिरोडा —सार्वजनिक बांधकाम विभाग ज़िल्हा परिषद गोंदियाअंतर्गत सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन ज़िल्हा परिषद सदस्य चतुर्भूज बिसेन यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे. माजी उपसभापती हुपराज जमईवार पंचायत समिती सदयस, डॉ .चेतलाल भगत पंचायत समिती सदस्य,सरपंच सविता अंबुले, शाहील मालाधारी, पवन तूरकर, दुर्गा अंबुले, तसेच सर्व सदस्य उपस्थित होते., सदर रस्ता तयार होत असल्याने शेतकर्यांची अडचण दूर होणार व चांदोरी ,अर्जुनी साठी जवळचा मार्ग होणार असल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, गवकार्यांची फार जुनी मागणी आज पुर्ण झाल्याची चर्चा आहे,नागरिकांनी ज़िल्हा परिषद, पंचायत समिती सदयस यांचे आभार मानले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वसामान्यांचा पक्ष – माजी आमदार राजेन्द्र जैन

0

एकोडी जिल्हा परिषद क्षेत्रात सभासद नोंदणीला सुरुवात

गोंदिया :राष्ट्रवादी काँग्रेस हा शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे. खा.प्रफुल पटेल यांनी नेहमीच सर्वसामान्य व्यक्तीला केंद्र स्थानी ठेवून विकासाची कामे केली आहेत. ती कामे जनतेपर्यंत पोहचिण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा. खा.पटेल सारखे सक्षम नेतृत्व आपल्या पाठीशी असुन सर्व सामान्य जनतेच्या समस्या जाणून त्या सोडवण्याचा पक्ष पदाधिकारी व कार्यकर्तानी प्रयत्न करावा. जनतेच्या अडचणी सोडवल्यास सामान्य माणूस पक्षाशी जोडला जातो. पक्ष संघटन मजबूती साठी जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सभासद नोंदणी करावी. पक्ष सभासद नोंदणी व पक्षाचा विस्तार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनसामान्यांपर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन राजेंद्र जैन यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका गोंदिया अंतर्गत श्री राजेशजी कटरे यांचे निवास स्थान एकोडी येथे एकोडी जिल्हा परिषद क्षेत्राकरीता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदस्यता अभियानाची सुरुवात माजी आमदार राजेंद्र जैन,विनोद हरिणखेडे, श्री.राजेशजी कटरे, सौ.अश्विनीताई रविकुमार पटले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, विनोद हरिणखेडे, प्रियाताई हरिणखेडे, अजय गौर, राजेश कटरे, अश्विनीताई पटले, मीनाताई कटरे, बंडूभाऊ नागभिरे, नागोराव लिचडे, रविकुमार पटले, द्वारका साठवणे, हितेश पताहे, हिरालाल मोहारे, रंजीत टेंभरे, आदेश कापसेकर, रघुवीरसिंह उईके, दिपक रिनायत, सुनील पटले शांतनू पारधी, पप्पू बिरणवार, आशाताई बाळने, रीनाताई क्षीरसागर, कविताताई मोहरे, फुलनबाई राऊत, सुनीतााताई बाळने, गोविंदजी लिचडे,देवलाल टेंभरे, रवि किसाने, मोनुभाई पठाण, गणपतजी किसाने, राजकुमार टालटे, महेश वट्टी, हंसराज मदनकर, तेजराम बावनकर, विश्वास रहांगडाले, जितेंद्रजी बनसोड, गिरधारीजी तुमसरे, लोकेशजी सोनवाने, सुनीलजी शेंडे, देवानंदजी लिल्हारे, नवलकिशोरजी हरिणखेडे, बाबुलाल चौधरी, किशोर हरिणखेडे, अशोक कनोजे, राजेश तायवाडे, रफीकभाई पठाण, अरिफभाई पठाण, इज्जूभाई तेले, जितेंद्र कनोजे, लंकेशजी पटले, मंगल जगनीत, नाना वहाणे, लोकेश नागभिरे, जितेश सोलंकी, सिद्धार्थ बोंबर्डे, रवि भदाडे, दिलीप टेंभरे, शैलेश शहारे, सुधीर कावळे, नवशादभाई शेख, चंद्रकुमार वडते, भावनाताई हरिणखेडे, मयूरजी रिनायत, संदीपजी कनोजे, प्रशांतजी मिश्रा, वासुदेवजी बिसेन, नितेशजी डुंडे, भूमेश्वरजी चौधरी, हितेशजी बिरणवार, श्रीरामजी बाळणे, रश्मीताई हरीणखेडे, शितलताई पटले, साहिस्ताताई शेख, गीताताई हरीणखेडे, मंगलाताई तुरकर, आशाताई वडते, रविकांताताई बिसेन, नसरीन शेख, रचीता सोनेवाणे, हिराजी तुमडाम, हरिकिसनजी नागपुरे, नामदेवजी मेश्राम, दुर्गेशजी खरोले, यशवंतजी बावणे, रामेश्वरजी कटरे, फागुलालजी चौधरी, गोवर्धनजी बरेकर, आनंदजी हरिणखेडे, अजयजी दरवडे, अनिताताई बिसेन, एकादशीताई पारधी, आशाताई बोदेले, शालुताई माने, विनोदजी शेंडे, अनिलजी बिसेन, अरुणजी बिसेन सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

लहान भावाच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचतांना मोठ्या भावाचा मृत्यू

0
गोंदिया : लहान भावाच्या हळदी कार्यक्रमात संपूर्ण कुटुंबीय व नातेवाईक सहभागी होवून आनंद साजरा करीत होते. याच कार्यक्रमात नाचत असताना वराच्या मोठ्या भावाला भोवळ येऊन मृत्यू झाल्याने आनंदाचे क्षण दु:खात बदलले.
ही घटना रविवारी (दि.४) रात्री ११:३० वाजताच्या सुमारास सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली येथे घडली. नेतराम सिताराम भोयर (४०) असे मृतक मोठ्या भावाचे आहे.
प्राप्त माहितीनुसार नेतराम भोयर यांच्या लहान भावाचे ५ मे रोजी लग्न होते. त्यामुळे भोयर यांच्या घरी रविवारी (दि.४) हळदीचा कार्यक्रम होता. हळदीच्या कार्यक्रमात संपूर्ण भोयर कुटुंबीय व्यस्त होते. साेमवारी विवाह असल्याने घरी वऱ्हाडी मंडळी सुध्दा आली होती. सर्व कुटुंबीय मिळून रात्री ११:३० वाजता हळदीच्या कार्यक्रमात नाचत होते. यात नाचत असलेले नेतराम भोयर हे अचानक भोवळ येऊन पडले. यानंतर कुटुंबीयांची धावपळ सुरु झाली. गावातील डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून नेतराम भोयर यांना मृत घोषीत केले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. या घटनेमुळे विवाह सोहळा असलेल्या भोयर कुटुंबीयावर दुख:चे डोंगर कोसळले. नवरदेव लग्न मंडपात जाण्यापुर्वीच मोठ्या भावाचे पार्थिव स्मशानभूमीत नेण्याची वेळ विवाह असलेल्या लहान भावावर आली. या घटनेमुळे संपूर्ण गाव हळहळले. नेतराम भोयर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व दोन भाऊ, आई, वडील असा आप्त परिवार आहे.
गोबरवाही शाळेत शिक्षक म्हणून होते कार्यरत
नेतराम भोयर हे भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही येथील जि.प.शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. लहान भावाचे लग्न असल्याने ते सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली येथे कुटुंबासह आले होते. सोमवारी विवाह सोहळा असल्याने संपूर्ण भोयर कुटुंबीय आनंदात होते. मात्र नेतराम भोयर यांचा हळदीच्या कार्यक्रमात नाचताना मृत्यू झाल्याने भोयर कुटुंबीयांवर मोठा आघात झाला.
दोन मुली झाल्या पोरक्या
नेतराम भोयर यांना दोन लहान मुली आहेत. वडीलांच्या अकाली मृत्यूने दोन मुली वडीलाच्या प्रेमाला पोरक्या झाल्या आहेत. तर मोठ्यामुलाच्या मृत्यूने भोयर कुटुंबीयांचा आधारवड हरविला आहे.

गुजराती नैशनल हाइस्कूल तथा एस.एम.पटेल जु. कॉलेज द्वारा 100% परीक्षा परिणाम की नेत्रदीपक परंपरा कायम

0

गोंदिया: श्री गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडल द्वारा संचालित गुजराती नैशनल हाइस्कूल तथा शांताबेन मनोहरभाई पटेल जुनियर कॉलेज ने कक्षा 12 के रिजल्ट में साइंस तथा कॉमर्स शाखाओं में प्रतिवर्ष शतप्रतिशत रिजल्ट की अपनी 18 वर्ष की परंपरा कायम रखी हैं।

संस्था अध्यक्ष व भूतपूर्व केंद्रीय मंत्री प्रफुलभाई पटेल, गोंदिया शिक्षण संस्था के सचिव व भूतपूर्व विधायक राजेंद्र जैन, संस्था कार्यकारी मंडल के सचिव अजयभाई वडेरा ने विद्यार्थियों की सफलता पर उन्हें प्रशंसा व बधाइयां प्रेषित की।साइंस के 139 तथा कॉमर्स के 63, इस प्रकार कुल 202 विद्यार्थी कक्षा 12 की परीक्षा में सहभागी होकर 100% सफलता दर के साथ उत्तीर्ण हुए।

कॉमर्स शाखा से 63 में से 58 विद्यार्थियों ने प्रवीण्य तथा प्रथम श्रेणी में नाम दर्ज कराया। 04 द्वितीय श्रेणी तथा 01 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणी में रहे। कु. हरकृपाकौर हरविंदरसिंह भाटिया ने 600 में से 587 अंक (97.83%) अर्जित कर महाविद्यालय से प्रथम स्थान प्राप्त किया। कु. आर्या विष्णु डडूरे तथा कु. प्राची कमल हसरानी दोनों ही छात्राएं 582 अंक (97%) के साथ द्वितीय, कु. अदिति आशीष कुमार मूंदड़ा 580 अंक (96.67%) के साथ तृतीय, कु. माही महेश अग्रहरि तथा कु. रोशनी हरीश भावनानी 575 अंक (95.83%) के साथ चतुर्थ एवम् अरमान मनीष आहूजा 574 अंक (95.67%) के साथ पांचवें स्थान पर रहे।

विज्ञान शाखा से 139 विद्यार्थियों में से 64 विद्यार्थी प्रवीण्य तथा प्रथम श्रेणी श्रेणी, 67 विद्यार्थी द्वितीय श्रेणी तथा 8 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणी में रहे।कु. निराली विपुल पलन ने 534 अंक (89%) के साथ प्रथम, निशांत अश्विनकुमार पटेल ने 522 अंक (87%) के साथ द्वितीय, यश आशीष शर्मा ने 521 अंक ( 86.83%) के साथ तृतीय, कु. नियति विपुल पलन ने 519 अंक (86.50%) के साथ चतुर्थ तथा कु. संश्रूति सत्यशील चौहान ने 496 अंक (82.67%) के साथ पांचवां स्थान अर्जित किया।

विद्यार्थियों ने अपनी सफलता का श्रेय अपने माता पिता, संस्था द्वारा विशेष मार्गदर्शन तथा सहयोग, साथ ही शिक्षकों के अध्यापन को दिया।

संस्था उपाध्यक्ष जयेशभाई पटेल तथा श्रीमती अमीबेन पटेल, सहसचिव चन्द्रेशभाई माधवानी तथा मयूरभाई जाड़ेजा एवं संस्था के गणमान्य सदस्यगण विजयकुमार जोशी,अवनेशभाई मेहता, सुधीरभाई राठौड़, निलेशभाई पारेख, जितेंद्रभाई परमार,उमंगभाई पटेल,धर्मेशभाई पटेल,विपुलभाई पलन,विनयभाई पटेल, श्रीमती पवित्राबेन पटेल, श्रीमती पूजाबेन शाह, महाविद्यालय की प्राचार्या श्रीमती रिजवाना अहमद, प्रभारी प्राचार्या श्रीमती जैस्मिन शेठ, पर्यवेक्षक श्री अरविंद पाटील , जे.एम.व्ही. इंग्लिश प्राइमरी स्कूल की प्राचार्या श्रीमती रेणुका जाडेजा, सभी शिक्षकवृंद व कर्मचारीगणों ने विद्यार्थियों की सफलता पर अभिनंदन किया।

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते युवा पुरस्काराचे वितरण

0

गोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणानुसार जिल्ह्यातील युवक-युवती व संस्थानी केलेल्या समाज हिताच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शासनाकडून जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतो. सन २०२१-२२ ते २०२४-२५ या वर्षांमधील गोंदिया जिल्ह्याचा युवा पुरस्कार जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी भय्यासाहेब बेहेरे, जिल्हा क्रीडाधिकारी नंदा खुरपुडे, तालुका क्रीडाधिकारी ए. बी. मरस्कोल्हे, रवींद्र वाळके, ओमकांता रंगारी उपस्थित होते.

जिल्हास्तर युवा पुरस्कार (युवक) करिता गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम १० हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सन २०२१-२२ या वर्षाचा जिल्हा युवा पुरस्कार आमगाव तालुक्यातील ग्राम किडंगीपार येथील रविकांत रूपलाल पाऊलझगडे, सन २०२३-२४ या वर्षाचा विनेश राधेश्याम फुंडे, सन २०२४-२५ या वर्षाचा तिरोडा येथील अमन हंसराज नंदेश्वर यांना देण्यात आला. तसेच सन २०२१-२२ मधील नवजीवन ग्रामीण विकास संस्था रामजीटोला आमगाव, सन २०२३-२४ या वर्षाचा शिवछत्रपती बहुउद्देशीय विकास संस्था गोंदिया तर २०२४-२५ या वर्षाचा डीजीएम तायक्वांदो स्पोर्ट्स एज्युकेशन ॲण्ड युथ अकादमी वांढराला देण्यात आला. जिल्हा क्रीडा पुरस्कारात वैयक्तिक सन २०२१-२२ या वर्षाचा पुरस्कार १० हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र तिरोडा तालुक्यातील ग्राम चुरडी येथील अंकिता अशोक सपाटे हिला प्रदान करण्यात आला. संचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले.

गर्ल्स महाविद्यालयाच्या संस्कृतीला कला शाखेत ९२.३३ टक्के   

0
गोंदिया ः येथील एस. एस. गर्ल्स महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या महाविद्यालयाची विद्यार्थिनी संस्कृती महेश भेंडारकर हिने ९२.३३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ज्योती नरेश बोकडे हिने ८१ टक्के, गुंजण रवींद्र काठेवारने ८०.१७ टक्के गुण मिळविले. त्याचप्रमाणे विज्ञान शाखेतील तनुश्री कपाट हिने ७९.१७ टक्के, तानिया उके हिने ७६.५० टक्के, ईशा भेंडारकर हिने ७४.८३ टक्के गुण मिळविले. तसेच कला शाखेतील इशिका पियूष तिवारी याने ७७.८३ टक्के, दिशा जितेश उजवणे हिने ७७.५० टक्के, निलाक्षी रोशन हिरापुरे हिने ७६.३३ टक्के गुण मिळविले. या सर्व विद्यार्थ्यांचा प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

गोंदिया जिल्ह्याचा निकाल ९४.०४ टक्के;विज्ञान शाखेत अपूर्वा बिसेन जिल्ह्यात प्रथम

0

गोंदिया : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता बारावीचा निकाल सोमवारी (दि.५) जाहीर झाला. यात नागपूर विभागात गोंदिया जिल्हा सलग दुसऱ्या वर्षी अव्वल ठरला आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.०४ टक्के लागला आहे. गेल्या वर्षी गोंदिया जिल्ह्याचा निकाल ९५.२४ टक्के लागला होता. यंदा त्यात १ टक्क्याने घट झाली असली तरी नागपूर विभागात जिल्ह्याने अव्वल स्थान कायम ठेवले आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी अपूर्वा टोपेशकुमार बिसेन ही 96.13(578) टक्के गुण घेऊन विज्ञान शाखेत जिल्ह्यात प्रथम आलेली आहे. तसेच ऋषभ गजानन गभणे 96.17(577), सुमित तुलाराम हेमने 95.67(574) जिल्ह्यातून द्वितीय व तृतीय आलेले आहेत.
फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत गोंदिया जिल्ह्यातील एकूण १७९८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यापैकी १७९०८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी एकूण १६८४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याची एकूण टक्केवारी ९४.०४ टक्के आहे. तर निकालात मुलीच सरस ठरल्या आहेत. बारावीच्या परीक्षेला एकूण ९२१४ विद्यार्थी तर ८६९४ विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या. यापैकी ८४५६ विद्यार्थी व ८३८५ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९१.७७ तर मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९६.४४ टक्के आहे. जिल्ह्यात शहरीभागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील शाळांचा निकाल सरस आहे. जिल्ह्यात तिरोडा तालुका बारावीच्या निकालात टॉप ठरला आहे. गोंदिया तालुक्याचा निकाल ९४.४२ टक्के, आमगाव ९२.०९ टक्के, अर्जुनी मोरगाव ९६.९८ टक्के, देवरी ९३.८८ टक्के, गोरेगाव ९१.६० टक्के, सडक अर्जुनी ८६.५१ टक्के, सालेकसा ९५.६१ टक्के, तिरोडा तालुक्याचा निकाल ९७.२१ टक्के लागला असून हा तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.