अकोला : सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने आघामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लक्षात घेता अकोला जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक संपन्न.
ही बैठक गुरुवार,दिनांक 8 मे रोजी स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाप्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर व जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी महानगरप्रमुख योगेश अग्रवाल, पश्चिन शहर प्रमुख रमेश गायकवाड, पूर्व शहर प्रमुख अँड.पप्पू मोरवाल, उपजिल्हाप्रमुख शशिकांत चोपडे, गोपाल म्हैसणे, निवासी उपजिल्हाप्रमुख संतोष अनासने, तालुकाप्रमुख विजय वानखडे, प्रकाश गीते, अनंत बगाडे, मुर्तीजापुर तालुका प्रमुख दीपक दांदळे, सचिन गालट, मंगेश म्हैसणे, जिल्हा समन्वयक गजानन पावसाळे, गणेश बोबडे, जिल्हा संघटक बादल सिंग ठाकूर, तालुका संघटक रमेश थुकेकर, शहर संघटक सागर पूर्णेय, राहुल जाधव,महिला समन्वयक स्वानंदीताई पांडे, महिला उपजिल्हाप्रमुख संगीताताई शुक्ला, महिला महानगरप्रमुख निशाताई ग्यारल, महिला शहर प्रमुख प्रीती मोहोळ, जयश्री तोरडमल, प्रतिभा दांगटे, युवा सेना लोकसभा प्रमुख कुणाल पिंजरकर, उपशहर प्रमुख प्रदीप काशीद, राजेश पिंजरकर, राजेश दांडेकर, प्रतीक मानेकर, नितीन बदरखे, भूषण इंदोरिया,स्वप्निल देशमुख, अश्विन लांडगे,दीपक नावकार, शुभम वानखडे, राजेश कलाने, सतीश समुद्रे, जिल्हा सचिव सतीश गोपनारायण, संजय रोहनकर, मधुकर सोनारगन ,चेतन जैन, समीर शहा, सुभाष भागवत, प्रवीण गावंडे, ऋषिकेश सोनारगन , राहुल सोनारगण, शेख एजाज, सुशांत साठे, योगेश ढोरे, अविनाश मोरे, तुषार इंगळे, प्रकाश परीयाल, आशु काळे, वैभव बोरचाटे, उत्तम डुकरे, विलास मानकर, प्रशांत घाटोळ, सुधाकर गोपकर, अनंत वाकोडे, सचिन शेवलकर, विकास कुरेकर, अक्षय येरमेकर, विशाल धोटे, फिरोज खान, मिलिंद बेंडे, गणेश शेळके, सौरभ शेळके, गोपाल शेळके, सोपान चावरे, तेजस वक्टे , सचिन घावट, सागर आवारे, अतुल अंभोरे, सुरत सिंग राजपूत, राजीव विल्हेकर, प्रवीण घोरमोडे, ज्ञानेश्वर जानोकार, संतोष काटोले, नितीन गंगलवार, नागेश इंगोले, किशोर घाडगे, संदेश काजळकर,भावेश नवले यासह शेकडो पदाधिकारी, शिवसैनि उपस्थित होते. यावेळी शहर प्रमुख रमेश गायकवाड, पप्पू मोरवाल, अकोला तालुकाप्रमुख विजय वानखडे, तालुकाप्रमुख सचिन गालट महिला जिल्हा समन्वयिका स्वानंदीताई पांडे, जिल्हा समन्वयक गजानन पावसाळे यांनी आपले विचार प्रकट केले. आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने संघटन बांधणी, संघटन रचना, व निवडणुकीच्या तयारीबाबत मार्गदर्शन शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंग दादा पिंजरकर व जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांनी केले. यावेळी अकोला पश्चिम, अकोला पूर्व व पातुर विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांना शिवसेना पक्षामध्ये प्रवेश देण्यात आला. यावेळी पेहेलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी झालेल्या भारतीय नागरिकांचा मिशन सिंदूर राबवत भारत सरकारने जे सडेतोड उत्तर दिले त्या प्रित्यर्थ पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांना मिशन सिंदूर हीच खरी श्रद्धांजली या भावनेने श्रद्धांजली अर्पन आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार महानगर प्रमुख योगेश अग्रवाल यांनी मानले.अशी माहिती जिल्हा प्रसिद्ध प्रमुख शंकर जोगी यांनी दिले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक..! जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक
मोझरी चौथे पुस्तकाचे गाव साकारणार-उद्योग मंत्री उदय सामंत
राष्ट्रवादीत विलीनीकरणाचे संकेत?; मोठा भूकंप होणार
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुलाखतीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. “आमच्या पक्षातील एका गटाला अजित पवारांसोबत जावं वाटतंय,” या त्यांच्या वक्तव्यानं राजकारणात नवा रंग भरला आहे.
यापूर्वी अनेक आमदारांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी मतदारसंघातील प्रश्नांसाठी संपर्क साधल्याचंही समोर आलं होतं. मात्र, माध्यमांसमोर कोणीही उघडपणे भूमिका मांडली नव्हती. आता पक्षप्रमुखांनीच थेट यावर भाष्य केल्यामुळे पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
गेल्या काही महिन्यांत शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) अनेकदा एकाच कार्यक्रमात दिसून आले. वेगवेगळ्या साखर कारखान्यांच्या बैठकीत दोघांची उपस्थिती आणि झालेल्या गुप्त चर्चांमुळे एकत्र येण्याच्या शक्यतेला पुष्टी मिळाली होती. मात्र यावर अधिकृतपणे कुठलाही खुलासा नव्हता.
आता शरद पवारांनी स्वतः या चर्चांना उघडपणे वाचा फोडल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आगामी काळात हे दोघे पुन्हा एकत्र येतात का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.
महाराष्ट्राची वित्तीय शिस्त आणि आर्थिक विकासातील योगदान कौतुकास्पद
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट होणार– शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे
महिला तलाठी अश्विनी ठोंबरेला ८०० रुपयांची लाच घेणे भोवले
सडक अर्जुनी: वारस फेरफार नोंद घेण्यासाठी पैशांची मागणी करून ती कार्यालयातील खासगी इसमामार्फत स्वीकारल्याप्रकरणी ग्राम चिखली येथील महिला तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकली आहे. अश्विनी ठोंबरे असे महिला तलाठी तर ओंकार शेंडे (रा. कोहळीटोला) असे खासगी इसमाचे नाव आहे.नाव असून सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली येथील तलाठी साजा क्रमांक १७ येथे कार्यरत आहे.
प्राप्त माहितीनुसार तक्रारदाराच्या आईचा मृत्यू झाल्याने सातबारा उतारावरून नाव कमी करून वारस फेरफार नोंद घ्यायची होती. यासाठी त्यांनी रीतसर कारवाईदेखील केली होती. मात्र वारस फेरफार नोंद घेण्यासाठी १ हजार रुपये लागतील असे सांगण्यात आले व तडजोडीअंती ८०० रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याची तक्रार त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता तलाठी ठोंबरे यांनी लाच स्वीकारण्याची इच्छा दर्शविली.
यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.८) दुपारी २:३० वाजता दरम्यान सापळा लावला व तक्रारदार लाच रक्कम देण्यासाठी तलाठी कार्यालयात गेला असता तलाठी ठोंबरे यांनी रक्कम कार्यालयात काम करणाऱ्या खासगी इसम ओंकार शेंडे यांच्या मार्फत स्वीकारली असता पथकाने दोघांनी रंगेहात पकडले.
महापालिकांवर ‘बसप’चा निळा झेंडा फडकणार-डॉ.हुलगेश चलवादी
पुणे:-राज्यात गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुकर झाला आहे.उशीरा का होईना,न्यायालयाने लांबलेल्या निवडणुकां संदर्भात संविधान अनुरूप निकाल दिला आहे, असे मत व्यक्त करीत बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.येत्या चार महिन्यांमध्ये होऊ घातलेल्या महानगर पालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीसाठी सज्जा व्हा,असे आवाहन त्यांनी पक्षाच्या कॅडरला केले. यासोबतच निवडणुका ‘बॅलेट पेपर’ वर घेण्याची मागणी डॉ.चलवादी यांनी केली आहे.
सर्वसामान्यांना मतदान आणि नेतृत्व निवडीचे अधिकार बहाल करणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाहीच्या संकल्पनेनुसार निवडणुका ‘बॅलेट पेपर’वर होणे आवश्यक आहे. बूथ बळकावने, मतपत्रिकांचा गैरवापर करणे असे प्रकार आता तंत्रज्ञानाने सुसज्जीत महाराष्ट्रात होणे शक्य नाही, त्यामुळे मत पत्रिकांवर निवडणूक घ्यावी, या मागणीचा डॉ.चलवादी यांनी पुनरोच्चार केला.
शोषित, पीडित, वंचित आणि उपेक्षितांचा विकासासाठी आणि ‘सर्वजन हिताय,सर्वजन सुखाय’ या नितीनुसार समाज परिवर्तनासाठी सत्तेच्या चाव्या बसपा कडे असणे आवश्यक आहे.राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनावर हत्ती निवडणूक चिन्ह असलेला बसपा चा ‘निळा झेंडा’ फडकणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ.चलवादी यांनी केले.
‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी’ ही संकल्पना समोर आणत बहुजनांचे नेतृत्व करणारी बसपा पूर्ण ताकदीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरणार आहे, असे डॉ.चलवादी यांनी स्पष्ट केले. शहर, जिल्हा तसेच ग्रामीण पातळीवर बसप कॅडर निवडणुकीसाठी सज्ज झाला असून ते उपेक्षितांना ‘शासनकर्ती जमात’ बनवण्यासाठी तन-मन-धन अर्पित करीत प्रयत्नरत आहे, असे डॉ.चलवादी म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर येत्या चार आठवड्यांमध्ये अधिसूचना काढणे राज्य सरकार ला बंधनकारक राहणार आहे.विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत २०२२ पूर्वीची ओबीसी आरक्षणाची स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले आहे. आरक्षणासंदर्भात तिढा त्यामुळे तूर्त सुटला आहे, असे डॉ.चलवादी म्हणाले.या निवडणुकीत मतदार त्यांची फसवणूक करणाऱ्या प्रस्थापित राजकीय पक्षांना धडा शिकवेल आणि बहुजनांच्या हक्काचे विचारपीठ असलेल्या बसपाला पाठबळ देईल, असा विश्वास डॉ.चलवादी यांनी व्यक्त केला.
बसपा केंद्र सरकार च्या पाठीशी…
पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देतांना भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदुर’ला बसपा चा पूर्ण पाठिंबा आहे. देशाच्या सुरक्षेसाठी केंद्राकडून घेण्यात येणाऱ्या प्रत्येक निर्णयाच्या पाठीशी बसपा उभी राहील, असे डॉ.चलवादी यांनी स्पष्ट केले.दहशतवादाला त्यांच्यात भाषेत उत्तर भारत उत्तर देईल, असे ते म्हणाले.
गावस्तरावरील विकास कामे वेळेत पुर्ण करा – पुलकित सिह
जिवती तालुक्यातील विकासकामांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडुन पाहणी
जिवती तालुक्यातील विविध गावांना भेटी देवुन, विद्यार्थी,ग्रामस्थांशी संवाद
चंद्रपुर,दि.08- चंद्रपुर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांनी नुकताच जिवती तालुक्याचा दौरा केलेला असुन, क्षेत्रीय भेटीदरम्यान जिवती तालुक्यातील विविध गावांना भेटी देवुन विविध विकास कामांची पाहणी केली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांनी जिवती तालुक्यातील भेटी दरम्यान ग्रामपंचायत पाटण येथील आदर्श आपले सरकार सेवा केंद्रास भेट देऊन, उत्पन्नाचा दाखला वितरण करण्यात आले. व महिला बचत गटांना कर्ज मंजुरी प्रमाणपत्र देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. उमेदचे प्रकल्प संचालक गिरीष धायगुडे यांच्या हस्ते मौजा शेणगाव येथे दिड महिन्यापूर्वी घरकुलाचे भूमिपूजन करण्यात आले होते. अशा पूर्ण झालेल्या घरकुलाची पाहणी करण्यात आली. मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देवुन, येथिल सोई सुविधांची पाहणी करण्यात आली. मॉडेल जिल्हा परिषद हायस्कूलची पाहणी करून, विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. पीटीगुडा नं 1 येथे ऑक्सिजन पार्क, नरेगा अंतर्गत बंधारा बांधकाम , सार्वजनिक कंपोष्टपिट च्या कामांची पाहणी केली. गावात मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. टेकमांडवा येथे उपआरोग्य केंद्राला भेट दिली . येथील आरोग्य विषयक सेवांची माहिती जाणुन घेतली व यंत्रणेतील अधिकारी व कर्मचा-यांना योग्य ते निर्देश देण्यात आले. जिल्हा परिषदच्या शाळेस भेट देऊन, विद्यार्थींशी हितगुज केली. पंचायत समिती जिवती येथिल सभागृहात विविध विभागाचे अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांचा विविध विकास कामांचा आढावा घेऊन गाव स्तरावरील विकास कामे वेळेत पुर्ण करण्याचे यावेळी उपस्थितांना निर्देश दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांच्या जिवती तालुक्यातील क्षेत्रीय भेटी दरम्यान उमेदचे प्रकल्प संचालक गिरीष धायगुडे ,जिवती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे व तालुका यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
लीलाबाई कुर्वे यांचे निधन
आमगाव,दि.०८ः तालुक्यातील कट्टीपार येथील रहिवासी व गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांची धाकटी बहीण लीलाबाई कुर्वे यांचे कट्टीपार येथील राहते घरी आज ८ मे रोजी साय.4.30 च्या दरम्यान निधन झाले.श्रीमती कुर्वे यांच्यावर उद्या शुक्रवारला ९ मे रोजी 11.00 वाजता कट्टीपार येथील मोक्षधाम येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
प्रभावी उपचारांद्वारे थॅलेसेमिया मुक्तीचा निर्धार –सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

