34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता शिवमबारच्या मॅनेजरची गळफास लावून आत्महत्या

शिवमबारच्या मॅनेजरची गळफास लावून आत्महत्या

0
4502

blank

चिचगड,दि.13ः- चिचगड पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या शिवम बारच्या मॅनेजरने गळफाल लावून आत्महत्या केल्याची घटना 11 सप्टेंबररोजी उघडकीस आली.पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.सविस्तर असे की, येथील शिवम बार मध्ये कार्यरत सुनील मोहबीया हे मॅनेजरचे काम करायचे.11 सप्टेंबरला सकाळी बारचा दरवाजा न उघडल्याने आणि भ्रमणध्वनीवर फोन केल्यावरही प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर खिडकीतून आत डोकावून बघितले असता पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.मोहबिया याने 10 सप्टेंबरच्या रात्रीलाच आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.मृतदेहाजवळ आढळलेल्या चिठ्टीत आपणास जिवन जगायची इच्छा नसल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे म्हटले.तो छत्तीसगड राज्यातील दुर्ग येथील रहिवासी होता.पुढील तपास हवालदार कवलपालसिग भाटीया, रवी जाधव करीत आहेत.

blank