माजी.जि.प.अध्यक्ष सीमा मडावी यांचे रुग्णालयात निधन

0
9068

गोंदिया,दि.13ः- गोंदिया जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांना निमोनियाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय कुवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारला सायकांळच्या दरम्यान हलविण्यात आले होते.त्यांचे आज रविवारला उपचारादरम्यान दुपारी १२.३०च्या सुमारास निधन झाल्याचे वृत्त आले आहे..निमोनियासोबतच त्यांना श्वास घेण्यास त्रास जात असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचीही माहीती समोर आली आहे.