42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ पाऊलझोला येथे कृषी विभागाच्यावतीने कृषी मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात

पाऊलझोला येथे कृषी विभागाच्यावतीने कृषी मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात

0
300

blank

चिचगड,दि.18(सुभाष सोनावने)ः– गोंदिया जिल्हा पोलीस,चिचगड पोलीस स्टेशन व कृषी विभागच्या सयुंक्तवतीने पोलीस अधिक्षक मंगेश शिदे,अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागात नक्षल चळवळीला आळा बसविण्याचे उद्देशाने पाऊलझोला येथे कृषी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पोलीस स्टेशन चिचगड अंतर्गत सशस्त्र दुरक्षेत्र गणुटोला हद्दीतील अतिनक्षलग्रस्त पाऊलझोला येथे आयोजित कृषी विषयक मार्गदर्शन कार्यक्रमाला कृषी अधिकारी कोळी,कृषी सेवक शहारे कृषी यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांना वृक्षाची लागवड व संगोपन कशाप्रकारे करावे याबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला 150 शेतकरी/ग्रामस्थांनी उपस्थित राहून लाभ घेतला. तसेच पाऊलझोला येथील ग्रामस्थंाची इन्फोरड फोअर हेड थर्मामिटर व पल्स ऑक्सीमीटर या उपकरणाद्वारे सामाजीक अंतर ठेवून तपासणी करण्यात आली.
सदर कार्यक्रमात अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी युवकांना रोजगार संबंधीत मार्गदर्शन केले.नागरीकांच्या समस्या जाणून त्याचे निराकरणाचे दृष्टीने मार्गदर्शन केले. तसेच गावातील 25 शेतकर्­यांना प्रत्येकी 05 फळझाळांचेे वाटप करण्यात आले.
सदर कृषी विषयक मार्गदर्शन शिबीरात पो.स्टे.चिचगड चे ठाणेदार अतुल तवाडे, स.दु गणुटोलाचे प्रभारी दिपक जगदाळे, पोउपनि.लक्ष्मण मोगले, संतोष यादव, पाऊलझोलाचे सरपंच श्री सलामे, पोलीस पाटील  अशफाक पठाण, पो.स्टे. चिचगड व सशस्त्र दुरक्षेत्राचे सह कर्मचारी व नक्षल प्रोपागंडा चे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

blank