
गोंदिया,दि.०७ः- जिल्हा पोलीस दादालोरा एक खिडकी योजनेअंतर्गत पोलीस अधीक्षक गोरख भामरे व अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांचे संकल्पनेतून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. मागील काही दिवसांमध्ये एओपी गोठणगाव अंतर्गत येणाऱ्या 5 अतीसंवेदनशील व 8 संवेदनशील अशा एकूण 13 दुर्गम व आदिवासी बहुल गावांमधील नागरिकांसाठी मोजा गोठणगाव, उमरपायली व बोंडगाव अशा ठिकाणी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात येऊन तज्ञ डॉक्टरांकडून डोळ्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीअंती एकूण 165 नागरिकांचे डोळे कमजोर तसेच त्यांना चष्मा लागत असल्याचे आढळून आले. AOP गोठनगाव च्या वतीने त्या सर्व व्यक्तींच्या डोळ्याच्या नंबर नुसार चष्मे बनविण्यात आले. सदर चष्मे बनवण्यासाठी स्वामी समर्थ भक्तगण सातारा यांचे व एओपीचे माजी प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन घाटे यांचे सहकार्य मिळाले.
आज रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी विवेक पाटील यांच्या शुभ हस्ते तसेच ठाणेदार केशोरी मंगेश काळे, पंचायत समिती सभापती आम्रपालीताई डोंगरवार, SRPF पीएसआय डोंगरे, एस.डी.पी.ओ कार्यालयातील हवालदार रवी दहिफळे, माजी जिल्हा परिषद सदस्य रतिराम राणे, पोलीस पाटील सांगोळे, उपसरपंच कांतीलाल डोंगरवार यांच्या प्रमुख उपस्थितीत एओपी येथे निःशुल्क चष्मे वाटप करण्यात आले.सदर चष्मे वाटप कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन AOP प्रभारी अधिकारी पोउपनी निळकंठ गित्ते यांनी केले असून जिल्हा पोलिस चे ASI अंबुले, मडावी, हवालदार भोवते, थेर, मिसार तसेच srpf चे अंमलदार व सी-60 हुमणे पथकाचे जवान यांनी मोलाचे सहकार्य केले.




