
तुमसर,दि.21-तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगांच्या सानिध्यात असलेल्या सोंडया येथील पहाडावर अवैध उत्खनन करुन गौण खनिजाची खुलेआम चोरी सुरु असतांना संबंधित अधिकारी मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचे समोर आले आहे.या अवैध उत्खननामुळे पर्यावरणाचा धोका निर्माण झाला आहे. अवैध उत्खनन बंद करण्यात यावे, अशी मागणी पर्यटकांनी केली आहे. सोंडया टोला पहाडीच्या पायथ्याशी असून पाच हेक्टर जागेचा लांब पट्टा आहे. सदर जागेचा गट क्रमांक ३६८ असून दिल्ली वन संधान केंद्राकडून ही जागा दगडी पहाड म्हणून घोषीत आहे. पाच हेक्टर जमिनीतून चार हेक्टर जागा तुमसरच्या ठेकेदारांना लीजवर देण्यात आली होती. तर एक हेक्टर जागा सार्वजनिक बांधकामाला देण्यात आली आहे. ती जागा सध्या मोकळी आहे.
सदर जागेवरून कागदोपत्री आपला ताबा सोडल्याचा देखावा करून त्याच जागेवर चोरीने अवैधरित्या उत्खनन करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्या जमिनीतील अवैधरित्या उत्खनन करणारे तो ठेकेदार कोण आहे, याची माहिती वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित अधिकाèयांना आहे. परंतू कुुंपनच शेत खाते तेव्हा कारवाई कोणावर, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी कामगार काम करीत आहेत. खदान खचून केव्हा धोका केव्हा होईल, याचा नेम नाही.
अवैधरित्या गिट्टी फोडणाèया कामगारांची विचारणा केली असता त्यांनी कोणाचेही नाव न सांगता आम्हीच अधिकारी अशी भुमिका घेतली. पोटाची खळगी भागविण्यासाठी आम्ही हे काम करीत आहोत, आम्ही तोडलेली गिट्टी व बजरी प्रती ट्रॅक्टर ८०० रूपयांपासून १२०० रूपयांपर्यंत विकल्या जात असल्याचे सांगितले जाते. ज्या ठिकाणी अवैध उत्खनन होत आहे. ते ठिकाण खेडकर टोली व सोंडया गावच्या मध्यभागी आहे. अवैधरित्या होत असलेले उत्खनन थांबविण्यात यावे, अशी मागणी पर्यटन प्रेमींनी केली आहे.





