28.1 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home राष्ट्रीय देश मीच त्या दहशतवाद्याचा दुर्दैवी बाप- पाकिस्तानी

मीच त्या दहशतवाद्याचा दुर्दैवी बाप- पाकिस्तानी

0
22

वृत्तसंस्था
नवी दिल्ली,दि. ७- पाकिस्तान भलेही उधमपूरमध्ये पकडलेला अतिरेकी नावेद आपला नागरिक असल्याचे नाकारत असले तरीही पाकिस्तानमध्ये असलेले नावेदचे वडील मोहंमद याकूबने त्याची ओळख दिली आहे. याकूबने आपणच नावेदचे ‘बदनसीब बाप’ असून पाकमध्ये आपल्या जिवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली. याकूब म्हणाला : ‘पाक सैन्य आणि लष्कर – ए- तोयबा आमचा पिच्छा पुरवत आहे. ते आम्हाला ठार मारून टाकतील.’ नावेदकडून मिळालेल्या मोबाइल नंबरवर एका इंग्रजी दैनिकाने याकूबशी चर्चा केली तेव्हा त्याने ही भीती बोलून दाखवली.भारतीय माध्यमांनी पाकिस्तानचा बुरखा फाडल्याने त्यांचा हा खरा दहशतवादी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. हिंदुस्तान टाइम्स या इंग्रजी वृत्तपत्राने नवीद याच्या पाकिस्तानातील कुटुंबाशी थेट संपर्क साधल्यावर ही माहिती उघड झाली.
मोहंमद नवीद असे जिवंत पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव असून, तो हल्ल्यानंतर एका काश्मीरमधील एका भारतीय नागरिकाच्या घरात लपला होता. त्या नागरिकाने शिताफीने त्याला पकडले. तत्पूर्वी, नवीद यानेही ‘मी पाकिस्तानी असून, मला येथून काहीही करून बाहेर काढा‘ अशी कबुली दिली होती.

‘तुम्ही भारतातून कॉल करीत आहात. आम्हाला मारून टाकतील. मीच तो दुर्दैवी बाप,‘ असे याकूब यांनी सांगितले. ते बोलताना उदासीन व घाबरलेले होते.

blank